शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 11:35 IST

Ashadh Ritual 2025: काही जुन्या परंपरा या केवळ धर्म, शास्त्राची नव्हे तर नात्यांची मोट बांधलेली राहावी या दृष्टीनेही आखल्या आहेत, लेकीला माहेरी बोलवण्याची प्रथाही त्यापैकीच एक!

आषाढ मास हा अनेक दृष्टीने महत्त्वाचा ठरतो. या महिन्यात येणारी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) तर महत्त्वाची ठरतेच शिवाय त्याच दिवसापासून सुरु होणाऱ्या चातुर्मासालाही(Chaturmas 2025) खूप महत्त्व असते. या काळात पावसाळा मुरायला लागतो त्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यासाठी गोडा-धोडाचे, तळणीचे पदार्थ ओघाने आलेच. हे ओळखून आपल्या पूर्वजांनी 'आषाढ तळण' ही प्रथा सुरु केली असावी. यालाच आषाढ तळणे असेही म्हणतात. 

आषाढ महिन्यात मुबलक पाऊस पडतो. अशा वातावरणात केवळ कांदा भजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो. मे महिन्यात केलेले वाळवणाचे पापड, कुरडया, सांडगे, शेवया यांना आषाढापासून न्याय द्यायला सुरुवात होते. श्रावणात व्रत वैकल्यांमुळे खाण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे आषाढ तळण अगदी दणक्यात पार पाडले जाते. हे घरगुती पदार्थ जिभेचे चोचले तर पुरवतातच, शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटकही पुरवतात. 

पूर्वी तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट मिठाच्या पुऱ्या, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, भजी, कडबोळी, अळू वडी, कोथिंबीर वडी, पुडाची वडी असे नानाविध पदार्थ केले जात असत. त्याला खीर, लाडू, शिरा इ. गोड धोड पदार्थांची जोड असे. तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी व आले पाकची वडी याचाही समावेश केला जातो. आता त्यात नवनव्या खाद्यपदार्थांची भर पडते आणि आखाड तळला जातो. 

एवढे पदार्थ केल्यावर सासरी गेलेल्या लेकीची आठवण होणार नाही, हे शक्य आहे का? म्हणूनच... 

आषाढात सासरी गेलेल्या लेकीला माहेरी बोलावण्याची परंपरा : 

लाडकी लेक माहेरी आली की घर आनंदून जाते. लग्नाला कितीही वर्ष लोटली तरी माहेराबद्दलचं आकर्षण, प्रेम, ओढ तसूभरही कमी होत नाही. माहेरच्या मंडळींबद्दल एक शब्दही वावगा ऐकून घेतला जात नाही. अशा माहेरी गेलेल्या लेकीचा सासरी जाताना पाय जड होतो. जशी तगमग तिची होते, तशीच घरच्यांचीदेखील होते. म्हणून सणवारांचे निमित्त काढून तिला घरी बोलावले जाई. सध्याच्या काळात सासर माहेर जवळ असल्याने निमित्त शोधावे लागत नाही, परंतु दर वेळी माहेरी जाताना वाटणारी ओढदेखील कमी होत नाही. 

ही प्रथा कशी सुरु झाली?

पूर्वी एप्रिल-मे महिन्यात लग्न होत असत. सासरी गेलेली आपली लेक कशी नांदत असेल? तिला कामातून उसंत मिळत असेल का? तिला समजून घेणारे कोणी असेल का? नवरा नीट वागवत असेल का? अशा अनेक शंकांचे निरसन करण्यासाठी, लेकीला माहेरपण देण्यासाठी, विश्रांती देण्यासाठी आषाढात तिला माहेरी बोलावले जात असे. आषाढ तळला की तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खाऊ घातले जात असत. ती मनाने तृप्त झाली की तिची पाठवणी केली जात असे. कारण त्यानंतर गौरी-गणपती आणि दिवाळीतच आगमन होत असे. त्यामुळे आषाढात बाहेर पावसाच्या आणि घरात मायेच्या सरींनी भिजून प्रेमाने ओथंबलेली लेक सासरी जात असे. 

मात्र बुधवारी पाठवणी केली जात नसे, कारण... 

पूर्वीची म्हण : 

'जाशील बुधी, तर येशील कधी?' बुध प्रदोषाच्या व्रतकथेवरुन ही म्हण आली असावी. पूर्वी आई-आजी म्हणत की बुधवारी गेलीस तर पुढचा बराच काळ सासरी परत येणार नाहीस अशी काळजी व्यक्त केली जात असे. या मायेपोटी लेकींना बुधवारी सासरी न पाठवण्याची प्रथा सुरु झाली असावी. 

तर तुम्ही कधी बोलावणं धाडताय तुमच्या लेकीला? 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५chaturmasचातुर्मास