शहरं
Join us  
Trending Stories
1
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
2
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
3
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
4
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
5
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
6
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
7
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
8
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
9
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
10
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
11
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
12
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
13
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
14
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
15
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
16
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
17
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
18
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
19
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
20
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन

Apara Ekadashi 2025: अकाली मृत्युचे भय टळावे, म्हणून अपरा एकादशीला करा 'ही' उपासना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:29 IST

Apara Ekadashi 2025: मृत्युची भीती प्रत्येकाला वाटते, अकाली मृत्यू तर नकोच वाटतो; ही भीती घालवण्यासाठी २३ मे रोजी अपरा एकादशीला दिलेली उपासना करा!

अपरा एकादशीला सुर्यपुजेला महत्त्व आहे. ती केली असता अकाली मृत्यूचे भय टळते असे शास्त्र सांगते. यंदा २३ मे २०२५ रोजी अपरा एकादशी(Apara Ekadashi 2025) आहे, त्यानिमित्त सूर्यपूजेची माहिती जाणून घेऊ आणि उपासना करू! 

हिंदू धर्मात पाच मुख्य देवतांमध्ये पहिले स्थान सूर्यदेवाला मिळाले आहे. कारण सूर्यदेव एकमेव असे आहेत, ज्यांना धरतीवरून प्रत्यक्ष पाहता येते. जीवसृष्टीसाठी सूर्यदेवाचे अतिशय महत्त्व आहे. वेदांमध्ये सूर्यदेवाला सृष्टीचा आत्मा म्हटले आहे. सूर्यप्रकाशामुळे सृष्टीचे चक्र सुरळीत फिरत आहे. सूर्यदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शास्त्राने रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्यावे असे सांगितले आहे. 

सूर्याला अर्घ्य दिल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता वाढते, तसेच हातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष घडलेल्या पापांपासून मुक्ती मिळते. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले आहे. जर तुमच्या कुंडलीत रवि प्रबळ असेल, तर तुमचे भाग्य तुम्हाला राजपथापर्यंत नेते. अशा व्यक्ती ज्या क्षेत्रात जातात त्याच्या शिखरापर्यंत पोहोतचात. अशा लोकांना सरकारी नोकरी मिळण्यातही अडचणी येत नाहीत. तुमच्या कुंडलीतील ग्रहदशा बदलून रविस्थान प्रबळ झाले, तर अन्य पापग्रहांचा त्रास तुम्हाला होऊ शकत नाही. 

सूर्यदेवाला प्रसन्न करून घेण्याचा उत्तम पर्याय आहे, सूर्याला अर्घ्य देणे. रविवार सूर्यदेवाला समर्पित आहे. अन्य दिवशी जमले नाही, तरी या दिवशी सूर्याला अवश्य अर्घ्य द्यावे. जी व्यक्ती सूर्यदेवांना अर्घ्य घेऊन दिवसाची सुरुवात करते, तिच्या वाट्याला अपयश येत नाही. सूर्याला अर्घ्य देण्याचे शास्त्रात अनेक फायदे सांगितले आहेत. 

  • सूर्याला अर्घ्य दिल्याने नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील.  तसेच नोकरीत बढती मिळत राहील. 
  • जी व्यक्ती सूर्याला अर्घ्य देते, तिला सूर्यासारखे तेज प्राप्त होते. त्यामुळे व्यक्तीमत्त्व आकर्षक बनते व लोकप्रियता वाढते. 
  • पुराणातील उल्लेखानुसार भगवान महाविष्णू यांनी राम अवतारात जन्म घेतला, तेव्हा ते रोज सकाळी सूर्याला अर्घ्य देत असत. याचेच फलित असे, की बलाढ्य शक्तीचा रावण श्रीरामांच्या केसालाही धक्का लावू शकला नाही. 
  • तुम्हालाही तुमच्या कार्यक्षेत्रात शिखर गाठायचे असेल, तर पुराणात सांगितलेला उपाय अवश्य करा
  • सर्वप्रथम सूर्योदयापूर्वी उठा. सूर्यदेवाला एका निरांजनात तेल आणि वात लावून दिवा दाखवा. त्यानंतर एका तांब्याच्या कलशात पाणी घेऊन पूर्व दिशेला तोंड करून 'ओम सूर्याय नम:' या मंत्राचा तीनदा उच्चार करा. अर्घ्य देऊन झाल्यावर जमिनीवर डोके ठेवून सूर्यदेवांना नमस्कार करा. 
  • यावेळी एक खास उपाय करा, जेणेकरून तुमचा अकाली मृत्य टळेल. आजारातून सुटका होईल. दीर्घायुष्य प्राप्त होईल. तो उपाय म्हणजे-
  • तांब्याच्या कलशात यमुनेच्या पाण्याचे दोन चार थेंब टाका. यमुना ही सूर्यदेवांची मुलगी आणि यमराजाची बहीण आहे. अर्घ्य देताना यमुनेच्या पाण्याचे थेम्ब टाकल्याने या दोन्ही देवता शीघ्र प्रसन्न होतात. 
  • तुम्ही जेव्हा केव्हा यमुनेचे दर्शन घ्याल, तेव्हा आठवणीने एका बाटलीतून यमुनेचे पाणी घरी घेऊन या. जेव्हा जेव्हा सूर्यदेवाला अर्घ्य द्याल, तेव्हा या पाण्याचे थेंब अवश्य टाका. 
  • हा उपाय केल्याने तुमच्या बरोबरच तुमच्या कुटुंबालाही अकाली मृत्यू येणार नाही आणि हर तऱ्हेच्या आजारातून सूर्यदेव तुमची सुटका करतील असा विश्वास धर्मशास्त्राने दिला आहे!
  • ज्यांच्याकडे यमुनेचे पाणी नसेल त्यांनी एका कलशात पाणी घेऊन त्यात तुळशीची पाने टाकून अर्घ्य द्यावे, तुळशी देखील तेवढीच पवित्र आणि विष्णुप्रिया असल्यामुळे या उपासनेचा लाभ होतो. 
टॅग्स :ekadashiएकादशीPuja Vidhiपूजा विधी