शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

Angarki Sankashti Chaturthi 2021: यंदाच्या वर्षातील दुसरी अंगारक संकष्ट चतुर्थी; पाहा, चंद्रोदय वेळ, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 6:11 PM

Angarki Sankashti Chaturthi 2021 July: सन २०२१ मधील दुसरी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या...

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया, अशा प्रथमेश असलेल्या गणपती बाप्पाची अबालवृद्ध उपासना, आराधना, पूजा अगदी भक्तिभावाने करत असतात.  गणपती बाप्पाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक गणेश व्रते करतात. प्रत्येक मराठी महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणपती व्रत केले जाते. यातील वद्य पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्ट चतुर्थी व्रत करण्याची प्राचीन परंपरा सुरू आहे. मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की, त्यावेळी अंगारक योग जुळून येतो, असे सांगितले जाते. सन २०२१ मधील दुसरी अंगारकी संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त, विविध शहरांमधील चंद्रोदय वेळा आणि व्रतपूजनाची सोपी पद्धत जाणून घ्या... (Angarki Sankashti Chaturthi 2021 Date)

तुळस एवढी पवित्र असूनही गणपती बाप्पाला व्यर्ज का? त्यामागे आहे 'ही' पौराणिक कथा!

    आषाढ अंगारक संकष्ट चतुर्थी: २७ जुलै २०२१ 

    आषाढ वद्य अंगारक चतुर्थी प्रारंभ: सोमवार, २६ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री २ वाजून ५४ मिनिटे.

    आषाढ वद्य अंगारक चतुर्थी समाप्ती: मंगळवार, २७ जुलै २०२१ रोजी मध्यरात्री २ वाजून २८ मिनिटे.

    शास्त्रानुसार देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा का करावी? त्यामुळे देवत्त्व कसे येते, वाचा

    भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे आषाढ महिन्यातील अंगारक संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन मंगळवार, २७ जुलै २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली की तिला 'अंगारक चतुर्थी' म्हणतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण दर महिन्यात करतो, परंतु अंगारक चतुर्थीचे महत्त्व अधिक असते कारण हा योग वारंवार येत नाही. विशेष म्हणजे चातुर्मासातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आला आहे. (angarki sankashti chaturthi july  2021 puja in marathi)

    चातुर्मासारंभ: जीवनशैली, ऋतुचक्राशी निगडीत सात्विकतेचा आरोग्यदायी काळ

    असे करावे संकष्ट चतुर्थीचे व्रत 

    संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी आणि धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. (Angarki Sankashti Chaturthi 2021 city wise chandrodaya timing)

    महाभारतानंतर पुढे काय झालं याची उत्सुकता आहे? मग ‘हे’ वाचा!

    विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

    शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
    मुंबईरात्रौ ०९ वाजून ५९ मिनिटे
    ठाणेरात्रौ ०९ वाजून ५९ मिनिटे
    पुणेरात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे
    रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे
    कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे
    सातारारात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे
    नाशिकरात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे
    अहमदनगररात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे
    धुळेरात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे
    जळगावरात्रौ ०९ वाजून ५० मिनिट
    वर्धारात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे
    यवतमाळरात्रौ ०९ वाजून ३९ मिनिटे
    बीडरात्रौ ०९ वाजून ४७ मिनिटे
    सांगलीरात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
    सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे
    सोलापूररात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे
    नागपूररात्रौ ०९ वाजून ३५ मिनिटे
    अमरावतीरात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
    अकोलारात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे
    औरंगाबादरात्रौ ०९ वाजून ५० मिनिटे
    भुसावळरात्रौ ०९ वाजता ४९ मिनिटे
    परभणीरात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे
    नांदेडरात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
    उस्मानाबादरात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे
    भंडारारात्रौ ०९ वाजून ३३ मिनिटे
    चंद्रपूररात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
    बुलढाणारात्रौ ०९ वाजून ४७ मिनिटे
    मालवणरात्रौ ०९ वाजून ५५ मिनिटे
    पणजीरात्रौ ०९ वाजून ५३ मिनिटे
    बेळगावरात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
    इंदौररात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे
    ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे

     

    टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी