शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Anant Chaturdashi 2022: श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून पांडवांनीसुद्धा केले होते अनंत चतुर्दशीचे व्रत; त्यांना काय लाभ झाला? वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:44 IST

Anant Chaturdashi 2022: काही व्रतं काळानुकाळ चालत आलेली आहेत, यावरून ती किती फलदायी आहेत हे लक्षात येते!

कौरव पांडवांमध्ये जेव्हा द्यूत खेळले गेले तेव्हा धर्मराज युधिष्ठिर आपल्याकडील सर्व संपत्ती, वस्तू गमावून बसले. सर्वस्व हरलेल्या पांडवांना त्यानंतर बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला. त्या काळात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना वनवासात भेट घेऊन युधिष्ठिराला या संकटातून मुक्तता व्हावी म्हणून हे अनंतचतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले. विशेष म्हणजे श्रीकृष्णाने त्याला या व्रताची एक कथा सांगितली. ती कथा अशी-

कृतयुगात सुमंतू नामक गुणी ब्राह्मण होता. त्याला एक मुलगी होती. तिचे नाव शीला. या मुलीच्या जन्मानंतर तिची आई मरण पावली. त्यामुळे सुमंतू ब्राह्मणाने पुन्हा लग्न केले. मात्र त्याची दुसरी पत्नी कजाग, भांडखोर होती. यथाकाल शीलाचे लग्न कौंडिण्यमुनीबरोबर झाले. लग्नानंतर ती सासरी जाण्यास निघाली त्यावेळी सुमंतूने पत्नीकडे शीलाला काही वस्तू आंदण म्हणून देण्याचा मनोदय व्यक्त केला. मात्र त्याच्या पत्नीने काहीही देण्यास नकार दिला. उलट मुलीचा आणि जावयाचा विनाकारण अपमान केला. अपमानित शीला दु:खी झाली. ती सासरी जाण्यास निघाली. वाटेत तिने नदीच्या किनारी काही स्त्रिया एकत्रितपणे पूजा करत असल्याचे पाहिले. ते अनंताचे व्रत होते. तिनेही लगेच पूजेत भाग घेऊन मनोभावे व्रत केले. 

व्रतात सांगितल्याप्रमाणे तिनेही स्वत:च्या हातात अनंताचा दोरा बांधून घेतला. नंतर ती सासरी आली. त्या व्रताचे फळ म्हणून तिच्या संसारात समृद्धी आली, सर्व तऱ्हेची सुख, संपदा तिला प्राप्त झाली. कौंडिण्यमुनीला या अचानकपणे प्राप्त झालेल्या भरभराटीचा गर्व जाला. एकदा त्यांनी शीलाच्या हातातला अनंताचा दोरा विनाकारण काढून अग्नीत टाकला. परिणामी अनंताचा त्याच्यावर कोप झाला. अचानकपणे आलेली समृद्धी आल्या पावली वेगाने निघून गेली. पुन्हा दारिद्रयाचे दिवस सुरू झाले. 

शीला समजूतदार होती. तिने पतीला त्याची चूक समजावून सांगितली. कौडिण्यमुनीला व्रताचे महत्त्व कळले. ते वनात गेले आणि त्यांनी अनंताचे व्रत करण्याचा निश्चय केला. अनंताचा शोध तो घेऊ लागला. परंतु त्याला अनंताचे दर्शन होईना. त्याने आयुष्य संपवून टाकायचे ठरवले. तेव्हा अनंताने अर्थात भगवान विष्णूंनी त्याला ब्राह्मणरूपात दर्शन दिले. अनंत चतुर्दशीचे व्रत करायला सांगितले. त्याने तसे केले. यथावकाश त्यांना गतवैभव प्राप्त झाले. 

कौडिण्यमुनीला जसे गतवैभव प्राप्त झाले, तसे पांडवांना प्राप्त व्हावे म्हणून श्रीकृष्णाने युधिष्ठिराला वनवासात असताना हे व्रत अंगिकारायला सांगितले. पांडवांनी तसे केले. त्यानुसार या व्रताचे फल प्राप्त झाले. 

कथेचे सार काय, तर उतू नका मातू नका घेतला वसा टाकू नका! परिस्थिती बदलत राहते. दुसऱ्यांना कमी लेखू नका. देवकृपेने मिळालेल्या गोष्टींचा आदर करा. आपल्याकडे असलेल्या गोष्टींवर गर्व आणि नसलेल्या गोष्टींचे दुःखं करत न बसता अनंताला साक्ष ठेवून प्रामाणिकपणे आपले काम करत राहा! आपणही हीच प्रेरणा घेत अनंताला साक्ष ठेवून प्रामाणिक पणे आपले काम करावे, ही शिकवण या कथेतून मिळते!

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीGanesh Visarjanगणेश विसर्जन