शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: हा खेळ सावल्यांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2020 04:28 IST

आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते.

नीता ब्रह्मकुमारी‘रात्रीस खेळ चाले, या गूढ चांदण्यांचा, संपेल ना कधीही, हा खेळ सावल्यांचा...’, हे गीत प्रसिद्ध आहे. मनुष्याबरोबर सतत राहणारी त्याची सावली. ही सावली प्रत्येकाची आपली आपली. कधी पुढे तर कधी पाठी. पण नेहमीच साथ देणारी. सूर्याशी जसा आपला संबंध त्यानुसार लहान-मोठी होणारी ही सावली. शाळेत असताना भूगोल शास्त्रात शिकविले जायचे की सूर्यासमोर उभे राहिले की आपली सावली आपल्या पाठीमागे असते. पण जर सूर्याशी पाठ करून उभे राहिले तर सावली आपल्या पुढे-पुढे चालते. पण या शास्त्राच्या नियमांत अनेक रहस्ये लपलेली आहेत. आपले कर्म सावलीसारखे आपल्यासोबत चालते. सावलीला कितीही वेगळे करण्याचा प्रयत्न केला तरीही ती वेगळी होऊ शकत नाही. तसेच कर्मापासून कितीही लांब पळण्याचा प्रयत्न केला तर ते सुद्धा त्याच वेगाने आपल्यासोबत धावत राहतात. हे कर्म फक्त एका जन्मापर्यंत पाठलाग करत नाही तर जन्मोजन्मी आपल्यासोबत चालतात. एखादी घटना घडली की आपण म्हणतो ‘माहीत नाही हे कोणत्या कर्माचे फळ आहे’. मग ती घटना सुखाची असो वा दु:खाची. आपण एखाद्या व्यक्ती अथवा वस्तूमागे जितके धावतो तितकेच ते दूर जातात. पण त्याकडे पाठ केली की ते आपल्या पाठी-पाठी येतात. आयुष्यात असे अनेक प्रसंग अनुभवतो. काही गोष्टींमध्ये नशिबाचा भागही असतो. प्रयत्नशील राहण्याची मात्र गरज आहे. आपल्या जीवनात सूर्यासमान प्रकाश देणारा ईश्वर आहे, जो पदोपदी मार्गदर्शन देतो. ज्यावेळी आपण त्याच्या साधनेत मग्न होतो तेव्हा भाग्य आपल्या पाठीमागे चालत येते. पण जेव्हा ईश्वराकडे पाठ करून वैभव, व्यक्ती, वस्तूंना साध्य करण्यासाठी धावतो तेव्हा त्या आपल्यापासून दूर जातात. ईशभक्ती आपल्याला शक्ती, मदत तसेच अचूक कर्म करण्याचा रस्ता दाखविते. ईश्वराशी बुद्धीने जोडलेले असल्याने चांगले-वाईटाची समज मिळते म्हणूनच नेहमीच त्या सूर्याकडे आपली नजर असावी.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक