शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: विषयाची पारख पारखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2020 00:24 IST

भक्त, योगी व विषया हे कधीच आजारी पडत नसतात. त्यांच्यात कफ, वात आणि पित्ताचं संतुलन असतं. भक्ताला ईश्वर सांभाळतो, योग्याला योग सांभाळतो.

बा. भो. शास्त्रीविषय म्हणजे विषयांचं ज्ञान होय. भोग्य वस्तूचा उचित भोग घेणारा. कोणत्या ऋतूत कोणता पदार्थ आणि किती प्रमाणात सेवन करावा, सकाळी कोणता, दुपारी आणि सायंकाळी कोणता खावा, याची ज्याला जाणीव आहे असा. खरं तर निसर्गाने आधीच स्वयंपाक केला आहे. माणसाने त्यात हस्तक्षेप केला. केवळ काकडी खाताना जो आनंद मिळतो, तो मीठ व तिखट लावल्याने मिळत नाही. चव हे जिभेचे चोचले आहेत. देहाची गरज नाही. पशू-पक्षी नैसर्गिक आहार घेतात. ते आहारात ढवळाढवळ करीत नाहीत. हत्ती बलवान, सिंह पराक्रमी, गरुडाची भरारी आणि वानराचं काटक शरीर, कारण ते निसर्गाच्या जवळ आहेत. आंब्याच्या रसात निसर्गाने साखर प्रमाणात टाकलेली असतेच. आम्ही वरून जास्तीची टाकतो. आम्ही खूप पदार्थांत भेसळ केली. मूळ पदार्थांचा स्वभाव बदलला.

विषम स्वभावाचे पदार्थ एकत्र करून खात असतो. त्याचा देहावर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. आज आपण भोग भोगत नसून, रोगच भोगत आहोत. भोगाची यादी वर दिलेलीच आहे. त्यात सर्व आहार सुखं आहेत. यथोचित भोग घेता आला नाही तर भोगातच रोग जन्माला येतात. उचित भोग घेणारे तीन सांगितले आहेत. भक्त, योगी व विषया हे कधीच आजारी पडत नसतात. त्यांच्यात कफ, वात आणि पित्ताचं संतुलन असतं. भक्ताला ईश्वर सांभाळतो, योग्याला योग सांभाळतो. जो विषयी आहे, त्याला त्याचा संतुलित आहारच सांभाळत असतो. या भोगाने भोगी तुष्ट होतो. पुष्ट होतो, श्रेय मिळते. आम्ही श्रेय सोडून प्रेयच्या मागे धावतो. प्रेयचा अतिरेक झाला आहे. जेवण अती, मोबाईलचा वापर अती. प्रवास अती, व्यसनं अती, जागरण अती, ते पोषक की घातक याचं ज्ञान नाही. श्रेयस्कर काय आहे, याचा विवेक नाही. रुचलं पाहिजे एवढंच सामान्यांना कळतं. विषयांचा ज्याला अभ्यास आहे, त्यालाच सूत्रात विषया म्हटलेलं आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक