शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
5
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
6
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
7
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
8
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
9
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
10
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
11
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
12
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
13
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
14
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
15
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
16
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
17
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

Amalaki Ekadashi 2024: आज आमलकी एकादशीनिमित्त 'हे' खास उपाय करा; धन-धान्य-समृद्धी मिळवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 07:00 IST

Amalaki Ekadashi 2024: यंदा २० मार्च रोजी आमलकी एकादशी आहे. या दिवशी आवळ्याच्या झाडाचे पूजन आणि इतर ज्योतिष शास्त्राय उपाय केले असता होतो भरघोस लाभ!

ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने आज ३ मार्च रोजी आलेली आमलकी एकादशी महत्त्वाची आहे.  आज ग्रहस्थिती अनुकूल असल्याने धनप्राप्ती आणि भाग्योदयासाठी केलेली उपासना फलद्रुप होऊ शकते असे ज्योतिषांचे सांगणे आहे. त्यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांची पूजा कशी करावी व कोणते उपचार करावे ते जाणून घेऊ. 

धनवृद्धीचा मिळेल आशीर्वाद :

आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू-माता लक्ष्मी यांचे वास्तव्य असलेल्या आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते. म्हणून तिला आमलकी एकादशी म्हणतात. आवळ्याच्या झाडावर त्या दोहोंचा वास असतो असे मानतात. त्यामुळे आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. घरात सुबत्ता नांदते. या दिवशी उपास केला जातो तसेच पुढील उपायही केले जातात. 

>> आमलकी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना २१ ताज्या पिवळ्या फुलांचा हार अर्पण करा. पूजेनंतर त्यांना दुधाचा किंवा साखरेचा नैवेद्य दाखवा. 

>> आमलकी एकादशीच्या दिवशी सकाळी विधीपूर्वक लक्ष्मीची पूजा करून देवीला एक नारळ अर्पण करावा. पूजेनंतर हा नारळ किमान आठवडाभर पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीजवळ ठेवा, काही काळाने आर्थिक स्थिती चांगली होऊ लागेल.

>> आमलकी एकादशीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळ्याचे सेवन करा. आवळ्याच्या झाडाच्या छायेत रोज प्रदक्षिणा घातल्यास आरोग्य सुधारते. 

>> विवाहित महिलांसाठी आमलकी एकादशी खूप खास आहे. जर काही कारणाने पती-पत्नीमध्ये वाद झाला असेल किंवा पतीला कोणत्याही कामात यश मिळत नसेल तर पत्नीने या दिवशी आवळा किंवा करवंदाच्या झाडाची पूजा करून झाडावर कापसाची सात वस्त्रे घालावीत तुपाचा दिवा लावावा. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३