शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या सर्वांचं आयुष्य हे 'असंच' असणार आहे; वाचा ही स्थित्यंतरं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 17:37 IST

आयुष्याचे हे  सरळ सोपे तत्त्वज्ञान जेवढ्या लवकर आपल्या लक्षात येईल, तेवढे आपले आयुष्य सोपे आणि समाधानी होईल.

यशस्वी होण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे. यश मिळवता येईलही, परंतु त्याला समाधानाची जोड नसेल, तर कुठे थांबावे, हे आपल्याला कळणारच नाही. आपण यशाच्या मागे धावत राहू. म्हणून एका तत्त्ववेत्याने यशाची व्याख्या आपल्या वयानुसार कशी बदलत जाते, त्याचे छान वर्णन केले आहे. तुम्ही, आम्ही, आपण सगळेच या परिस्थितून जात आहोत, जाणार आहोत. त्यामुळे यशाची परिमाणे आताच निश्चित केली, तर यशामागे धावताना धाप लागणार नाही आणि वेळोवेळी आयुष्याचा आनंदही घेता येईल. काय आहे ती व्याख्या, पहा... 

पहिल्या वर्षी चालता येणे हे यश...  चौथ्या वर्षी झोपेत गादी ओली न होणे हे यश...  आठव्या वर्षी शाळेतून एकट्याने घरी परत येता येणे हे यश...बाराव्या वर्षी मित्र मैत्रिणी बनवता येणे हे यश...  अठराव्या वर्षी स्वतःचा ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे हे यश.... तेविसाव्या वर्षी पदवीधर होणे, हे यश... पंचविसाव्या वर्षी पहिला पगार हातात घेणे, हे यश... तिसाव्या वर्षी जोडीदार मिळवून लग्न होणे हे यश...  पस्तिसाव्या वर्षी बचतीला सुरुवात होणे हे यश...  पंचेचाळिसाव्या वर्षी उत्साही राहता येणे हे यश...  पन्नासाव्या वर्षी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देता येणे हे यश... पंचावन्नाव्या वर्षी न थकता काम करता येणे हे यश...

आता उलट प्रवास....

साठाव्या वर्षी न घाबरता ड्रायव्हिंग करता येणे हे यश...  पासष्ठाव्या वर्षी निरोगी राहता येणे हे यश...  सत्तराव्या वर्षी डोक्यावर कसलेही ओझे नसणे, हे यश... पंचाहत्तराव्या वर्षी जुन्या मित्रांची सोबत टिकवणे हे यश...  ऐंशीव्या वर्षी घराचा पत्ता न विसरता घर गाठता येणे हे यश...  पंच्यांशीव्या वर्षी गादी ओली होऊ न देणे हे यश...  नव्वदाव्या वर्षी काठीचा आधार न घेताही चालता येणे हे यश...  

यश हे अन्य काही नसून एक शृंखला आहे आपल्या अस्तित्त्वाची! ती आपला परीघ पूर्ण करते आणि आपण मात्र यशाची तुलना इतरांशी करत राहतो. आयुष्याचे हे  सरळ सोपे तत्त्वज्ञान जेवढ्या लवकर आपल्या लक्षात येईल, तेवढे आपले आयुष्य सोपे आणि समाधानी होईल. यशस्वी जरूर व्हा, त्याला समाधानाची जोड द्या!