शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला ज्या गोष्टींचे दान कराल तेवढे चौपटीने तुमच्याकडे परत येईल; वाचा दानाचा आणि सणाचा महिमा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2023 14:27 IST

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला खरेदीपेक्षाही दानाला जास्त महत्त्व आहे, त्यामुळे जे आपल्याकडे हवे असे वाटत असेल त्या गोष्टीचे आज दान करा!

अक्षय्य तृतीया या तिथीतच वर्णन आढळते की ज्याचा क्षय होत नाही ती अक्षय्य तिथी. आजच्या दिवशी गोष्टी घेतल्याने वाढत नाहीत तर दिल्याने वाढतात. म्हणून आपल्या संस्कृतीने दानाला महत्त्व दिले आहे. लोक आजच्या दिवशी सोने खरेदीला महत्त्व देतात. सोने हे वैभवाचे प्रतीक तर आहेच मात्र त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचे म्हणजे आनंद आणि समाधान ते मिळणे फार महत्त्वाचे आहे. या दोन गोष्टी आपल्या आयुष्यात हव्या असे वाटत असेल तर पुढील गोष्टी लक्षात ठेवून त्याप्रमाणे अनुसरण केले पाहिजे. 

दानाचे महत्त्व आपण सगळेच जण जाणतो. परंतु कधी परिस्थिती अभावी, तर कधी वेळेअभावी आपल्याकडून दान दिले जात नाही. दान देण्यासाठी आर्थिक श्रीमंती बरोबर मनाची श्रीमंती सुद्धा असावी लागते. दातृत्त्वाचा गुण अंगी असावा लागतो. दानाचे अनेक प्रकार आहेत. पैकी आपल्या सर्वांना सहज साध्य असलेला प्रकार म्हणजे वस्त्रदान!

आता काही पूर्वीसारखे दिवस राहिले नाहीत, की वर्षातून एकदा कपड्यांची खरेदी करावी. आता सण वाराची वाट न पाहता वरचेवर कपड्यांची खरेदी सुरू असते. अशा वेळी नवीन कपडे घेताना जुने परंतु न फाटलेले कपडे वेळीच गरजू लोकांना दान केले, तर तुमची आणि त्यांची गरज नक्कीच पूर्ण होऊ शकेल. नवे कोरे, न वापरलेले कपडे देणार असाल तर त्यालाही आपण काही निर्बंध लावून घेतले पाहिजे. 

कपड्यांना द्या नवे रूप : थोडे फार फाटलेले कपडे फेकून देण्यापेक्षा रफ़ू करून गरजू लोकांना दान करा. आजच्या काळात अनेक कलाकार आहेत, जे जुन्या फाटलेल्या कपड्यांचे रूप पालटून त्याला नवीन साज देतात. कापडी पिशवी, गोधडी, ओढणी, पायपुसणी, चादर, पडदे असे नानाविध प्रकार जुन्या कपड्यांपासून शिवता येतात. 

कपडे नेहमी धुवून द्या: कपडे देण्याआधी ते नेहमी धुवून नीट घडी करून मगच दान करा. कपड्यांमुळे त्वचेशी संबंधित आजार होऊ नये, यासाठी कपडे धुवून वाळवून मगच दुसऱ्यांना दिले पाहिजेत. 

ऋतूनुसार कपडे द्या : उन्हाळ्यात सुती कपडे, पावसाळ्यात छत्री, रेनकोट किंवा उबदार चादरी, हिवाळ्यात स्वेटर, शाली, गोधड्या, सोलापुरी चादरी यांचे दान केले पाहिजे. अन्यथा ऋतुमानानुसार कपडे नसतील तर त्या दानाचा काहीच उपयोग नाही. 

सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी : अनेकदा आपल्याला दान करण्याची इच्छा असते. परंतु दान नेमके कोणाला करावे, हे उमगत नाही. किंवा आपल्या संपर्कात तसे लोक नसतात. अशा वेळी सेवाभावी संस्थांची मदत घ्यावी आणि ज्या संस्था मनापासून काम करत आहेत, त्यांना मदत करून खारीचा वाटा उचलावा. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीया