शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला पितरांच्या नावे कुंभदान केल्यास लाभते घडाभर पुण्य; वाचा आणखी काही व्रते!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2023 17:44 IST

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेचा दिवस अनेकार्थाने महत्त्वाचा आहे, त्यादिवशी केली जाणारी व्रते आपल्या खात्यात पुण्यसंचय करण्यास मदत करतात, कशी ते पहा. 

वैशाख शुद्ध तृतीयेस अक्षय्यतृतीया म्हणतात. हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. चैत्रागौरीच्या आंदोलनोत्सवाची या दिवशी सांगता होते. यंदा २२ एप्रिल  रोजी अक्षय्यतृतीया आहे.

अक्षय म्हणजे अविनाशी, म्हणूनच या दिवशी केलेले होम, हवन, दान, स्नान, तर्पण, पूजा, जप आदि पुण्यकर्म अक्षय टिकते असे शास्त्र सांगते. ही शुभतिथी आहे, तशी पुण्यतिथीही आहे. त्यामुळे श्राद्ध दिवस मानून या दिवशी पितरांची पूजा केली जाते. गृहस्थ सपत्नीक पितृत्रयी (वडील, आजोबा, पणजोबा) मातृत्रयी (आई, वडिलांची आई, वडिलांची आजी) मातामहत्रयी (आईची आई, आजी, पणजी) यांना उद्देशून पिंडरहित श्राद्ध करतात. विस्तृत श्राद्ध नसल्यास पितरांसाठी म्हणून दक्षिणेसह उदकुंभदान करतात. हा सण उन्हाळ्यात येत असल्याने त्यानिमित्ताने पितरांचे स्मरण करून कुंभ दान केल्यास, उन्हापासून बचाव होण्यासाठी छत्री दान केल्यास दुसऱ्या जीवाला संतुष्टता लाभते आणि ते पुण्य आपल्या खात्यात जमा होते. 

याशिवायही अक्षय्य तृतीयेला आणखी काही व्रत केली जातात, त्याबद्दल जाणून घेऊ. 

वैशाख शुद्ध तृतीयेस पुनर्वसू नक्षत्रावर रात्रीच्या पहिल्या प्रहरी राहू मिथुन राशीत आणि सहा ग्रह उच्चीचे असताना माता रेणुकेच्या पोटी भगवान परशुरामांचा जन्म झाला म्हणून या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरी परशुराम जयंती साजरी करतात. या दिवशी प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून त्यास अर्घ्य देतात.

याच दिवशी अलवण तृतीया व्रत करतात. हे स्त्रीव्रत असून द्वितीयेला उपवास करतात. तृतीयेला गौरीची पूजा करतात. मीठ न घातलेले अर्थात अळणी पदार्थ सेवन केले जातात. हे व्रत भाद्रपद किंवा माघाच्या शुक्ल तृतीयेपर्यंत केले जाते.

सद्यस्थितीत हे व्रत फारसे केले जात नाही. परंतु आरोग्याच्या दृष्टीने पाहिले, आहारातून मीठ कमी केले तर हे व्रत नक्कीच आरोग्यदायी ठरेल. मिठाचा त्याग व्रताची सात्त्विकता अधिकच वाढवील यात शंका नाही. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीया