शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Adhik Maas 2023: आपल्याही आयुष्याचा शेवट गोड व्हावा असे वाटत असेल तर 'या' गोष्टीकडे लक्ष द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 07:00 IST

Adhik Maas 2023: जन्माबरोबर सुरू झालेला आयुष्याचा प्रवास कधी संपेल, थांबेल माहित नाही, पण त्याची पूर्वतयारी आधीच करायला हवी ना!

जन्म यातनेतून होतो, त्यामुळे मृत्यू अर्थात शेवट तरी गोड व्हावा, अशी आपली सर्वांचीच इच्छा असते. समाज माध्यमावर एका वृद्ध गृहस्थांचा हा फोटो वाचला आणि खाली कॅप्शन होती, श्रीमद् भागवत पुराण वाचत असताना, श्रीविष्णू चरणी प्राणार्पण! त्या गृहस्थांच्या नशिबाचा हेवा वाटला. मरण कोणालाच सांगून येत नाही, पण आलेच तर असे सुखासुखी यावे. हेच तुकोबांनी देखील मागितले होते, 

याजसाठी केला होता अट्टाहास । शेवटाचा दिस गोड व्हावा ॥१॥आतां निश्चितीनें पावलों विसांवा । खुंटलिया धांवा तृष्णेचिया ॥ध्रु.॥कवतुक वाटे जालिया वेचाचें । नांव मंगळाचें तेणें गुणें ॥२॥तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी । आतां दिवस चारी खेळीमेळीं ॥३॥

आपण जन्माला येताना रडतो, पण आई आनंदाश्रू ढाळते, तसेच आपण मरताना आनंदात जावे आणि आपल्या पाठीमागे चार लोकांनी रडावे असे वाटत असेल तर आयुष्यभर सत्कर्म करावे लागते. जीवन आणि मृत्यू या दरम्यानचा प्रवास स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुखकर बनवला तरच शेवटही गोड होतो. हे ज्यांना कळले त्यांना जीवन कळले असे म्हणता येईल. मात्र आपण भेदभाव, द्वेष, वैर, लोभ, हव्यास या विकारांमध्ये एवढे गुंतून जातो की हा प्रवास कुठे न्यायचाय आणि कधी थांबवायचाय हेच लक्षात येत नाही. 

म्हणून आपल्या आयुष्याचे ध्येय हे सत्कर्म करणे हेच असायला हवे. आपल्या कडून कोणाही जीवाचा मत्सर घडू नये यासाठी दक्ष असावे. प्रामाणिकपणे आपले जीवन जगावे. त्या कामाची पावती खुद्द भगवंत देतो. आणि विनासायास मरण देतो. यासाठी कर्तव्याप्रती जागृत होऊन या अधिक मासात आणि कायमस्वरूपी रोज झोपताना एक श्लोक म्हणूया , 

अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनम् । देहान्ते तव सायुज्यं देहि मे परमेश्वरम् ॥

नमो भगवते वासुदेवाय!

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना