शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

Adhik Maas 2020: पूजेवेळी घंटानाद का करतात, जाणून घ्या शास्त्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 07:00 IST

Adhik Maas 2020: घंटानादाने देवतेला आवाहन केले जाते. वाईट वृत्तींनी तिथून निघून जावे असा त्यामागचा आशय असतो. 

ठळक मुद्देघंटानादाने चैतन्यात्मक ईश्वरी तत्त्व जागृत होते.घंटानाद वातावरणात सकारात्मक लहरी निर्माण करतो.

प्रात:काली दूर मंदिरातून घुमणारा सुमधूर घंटानाद किंवा देवघरातील पूजेनंतर झालेला घंटीनाद वातावरणात सकारात्मक लहरी निर्माण करतो. आपल्याप्रमाणे देवांनाही घंटानाद प्रिय असतो. म्हणूनच विष्णूपुजेतही घंटेला पुजेचा मान असतो.

षोडशोपचार पूजेत घंटेची पूजा समाविष्ट असते. त्यासाठी एक श्लोकही म्हटला जातो. 

आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसाम् कुर्वे घंटारवं तत्र देवताव्हानलक्षणम् ।।

घंटानादाने देवतेला आवाहन केले जाते. वाईट वृत्तींनी तिथून निघून जावे असा त्यामागचा आशय असतो. 

हेही वाचा: Adhik Maas 2020: तुका म्हणे पाही, विठ्ठल गणपती दूजा नाही।

घंटानाद का करतात?

घंटानादाने चैतन्यात्मक ईश्वरी तत्त्व जागृत होते. वातावरणात असंख्य कंपने निर्माण होतात. सर्वत्र ओतप्रोत भरलेले ईशचैतन्य जागृत होते. मंदिरातील मूर्तीत किंवा देवघरातील देवांमध्ये वेदमंत्रोच्चाराने ईशतत्वाचे आवाहन व प्रतिष्ठा केलेली असते. मंत्रांमध्ये ईशतत्वाशी संपर्क, साक्षात्कार, वशीकरण, आवाहन करण्याचे सामर्थ्य असते. घंटानाद केल्यामुळे वातावरणाला जोड मिळते. 

घंटानादाचे अनेक प्रकार आहे. 

शुक्राचार्यांनी नीतिसार नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यात राजमहालांच्या, मंदिरांच्या प्रवेशद्वारी असलेल्या द्वारपालांनी प्रहरा प्रहराला घंटानाद करावा, असे म्हटले आहे. संकट येण्याची पूर्वसूचना मिळाल्यास मोठ्यामोठ्याने घंटानाद करावा अशी सूचना खिस्ती धर्मस्थळात दिली जाते. हिंदू मंदिरात घंटानाद पूजा अर्चा, होम-हवन, आरती किंवा दर्शनाच्या वेळी केला जातो. तसेच अलीकडे गणेशोत्सवाच्या वाद्यसमुहातही घंटानादावर ताल धरला जातो. 

अन्य धर्मामधील घंटेचा वापर:  हिंदूंशिवाय जैन, बौद्ध, खिस्त धर्मातही घंटानाद केला जातो. ब्रह्मदेश, चीन, जपान, इजिप्त, इटली, फ्रांस, रशिया, इंग्लंडमध्येही घंटा वापरतात. 

नवस फेडण्यासाठीदेखील घंटेचा वापर:  मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुमुहूर्तावर देवालयात घंटा बांधावी, असे पुराणात सांगितले आहे. पितृपूजा विधीतही घंटानाद आवश्यक मानला जातो. वास्तुशास्त्रातही घंटेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. आपल्या राहत्या घरात मधुर आवाजाच्या लहान घंटा टांगून त्यांचा मंगलकारक नाद ऐकावा, असे म्हटले जाते. तेच शास्त्र आपण फेंगश्युई नावे पाळतो. त्याबरोबरच घंटानाद करून पूर्वजांनी सांगितलेल्या सूचनाही अंमलात आणणे सहज शक्य आहे. 

घंटेचे सहा प्रकार : कास्यताल, टाळ, घंटिका (गोलसर), थाळी, विजय घंटा (जयघंटिका), क्षुद्रघंटी (देव्हाऱ्यामध्ये ठेवतात ती) आणि देवळात, सभामंडपात टांगलेली घंटा, असे सहा प्रकार आहेत. 

अशाप्रकारे विष्णूंना पूजेचे आवाहन करताना घंटानाद जरूर करावा आणि त्या नादब्रह्मात पूजाविधी पार पाडावेत.

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक मासात करावे दीपदान, जग करूया प्रकाशमान

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना