शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

गरुडपुराणानुसार व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करणे का महत्त्वाचे असते, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 17:28 IST

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर पिंडदान करणे अनिवार्य मानले जाते. पिंडदान विधी केल्याने आत्म्याला सद्गती मिळते, असे गरुड पुराण सांगते. 

जिवंतपणी व्यक्ती विषय वासनेत अडकलेली असते. ज्ञानाच्या परमार्थाच्या गोष्टी आत्मसात करत नाही आणि अचानक मृत्यू आला की सर्व काही जागच्या जागी सोडून परलोकी निघून जाते. अशा वेळी आत्म्याच्या उद्धारासाठी व त्याला योग्य दिशेने गती मिळावी यासाठी गरुड पुराणाने पिंडदान महत्त्वाचे आहे असे सांगितले आहे. 

असे मानले जाते की मृत्यूच्या तेराव्या दिवशी, पिंडातून आत्मा ब्रह्माण्डात जातो. हा सूक्ष्म आत्मा परमात्म्यात विलीन होण्यासाठी त्याला योग्य दिशा दर्शवणे गरजेचे असते. या तेरा दिवसात व्यक्तीने आयुष्यभर केलेल्या पाप पुण्याचा हिशोब केला जाऊन त्याला त्याच्या कर्मानुसार गती मिळते. श्राद्ध विधी त्याकरिताच सांगितलेल्या आहेत. या विधीनुसार आत्म्याला सर्व विकारातून, विषयातून मुक्त करून अखिल विश्वशक्तीत सामावण्याचा मार्ग दर्शवला जातो. 

मृत्यूपश्चात तेरा दिवस आत्मा घुटमळत असतोगरुड पुराणानुसार मृत व्यक्तीचा आत्मा १३ दिवस त्याच्या आवडत्या व्यक्तीजवळ, विषयांजवळ घुटमळत राहतो. या काळात त्याला राहिलेल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुन्हा देहात प्रवेश करायचा असतो. परंतु एका जन्मात अनंत यातना भोगल्यानंतर पुन्हा जन्मच नको, तर मोक्ष मिळावा, यासाठी आत्म्याला विषय वासनेपासून मुक्त केले जाते. जिवंत पणी केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून आत्म्याला मोहपाशापासून दूर करण्यासाठी श्राद्धविधी केला जातो. 

पिंड दान देऊन आत्म्याला अन्न मिळतेदरम्यान, नातेवाईक १० दिवस आत्म्यासाठी पिंड दान करतात. ज्याद्वारे त्याचे सूक्ष्म शरीर तयार होते. पहिल्या दिवसापासून आत्मपिंड, दुसर्‍या दिवसापासून मान आणि खांदा, तिसऱ्या दिवसापासून हृदय, चौथ्या दिवसापासून पाठ, पाचव्या दिवसापासून नाभी, सहाव्या दिवसापासून आठव्या दिवसापर्यंत कंबर व खालचा भाग, भूक आणि तहान इ. जाणीव नवव्या आणि दहाव्या दिवसापर्यंत तयार होतात . असा सूक्ष्म देह धारी आत्मा परलोकीच्या प्रवासाला निघतो. या सर्व गोष्टींसाठी श्राद्ध विधी महत्त्वाचा मानला जातो.