शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

गरुड पुराणानुसार 'या' लोकांच्या घरी चुकूनही जेवू नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 13:04 IST

जसे अन्न खातो, तसे आपले विचार तयार होतात. म्हणून अन्न ग्रहण करताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवेत.

पुरातन काळापासून परान्न अर्थात दुसऱ्याच्या घरचे जेवण हे निषिद्ध सांगितले आहे.  उठसुठ कोणाकडेही जेवू नये. ज्याठिकाणी जेवायला बोलवले जाते, तिथेही अन्नपरीक्षा घेतल्याशिवाय जेवू नये. असे काही नियम आपले पूर्वज कटाक्षाने पाळत असत. परंतु, अलीकडच्या काळात आपण मागचा पुढचा विचार न करता आवडती वस्तू दिसली की पटकन तोंडात टाकतो. त्याचे विपरीत परिणामही भोगावे लागतात. म्हणून स्व-गृहव्यतिरिक्त बाहेर कोणाकडेही जेवताना किंवा खाताना गरुड पुराणात दिलेले नियम आपण पाळतोय ना, ते लक्षात घ्या. 

जसे अन्न खातो, तसे आपले विचार तयार होतात. म्हणून अन्न ग्रहण करताना काही नियम कटाक्षाने पाळायला हवेत. ते नियम पुढीलप्रमाणे आहेत-

एखाद्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसेल आणि या गोष्टीची आपल्याला पूर्ण कल्पना असेल, तर त्या व्यक्तीच्या घरी कदापिही जेवू नका. तसे केल्याने तुम्हीदेखील अप्रत्यक्षपणे त्याच्या पापात सहभागी होतात. 

जे लोक दुसऱ्यांना लुबाडून धन संपत्ती कमावतात, अशा लोकांची संगत आणि सहभोजन टाळा. 

चारित्र्यहीन व्यक्ती, व्यसनी व्यक्ती, वाईट विचारधारणा असणारी व्यक्ती त्यांच्या वाऱ्यालाही थांबू नका. सहभोजन तर दूरच! वाईट लोकांच्या संगतीत येऊन आपणही वाईटच बनतो. 

आजारी व्यक्तीच्या घरी जेवू नका. आजारी व्यक्तीच्या घरी आजाराच्या प्रादुर्भावामुळे संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. 

जे लोक इतरांच्या चुगळ्या करतात, एकमेकांच्या मागे नावे ठेवतात, असे लोक विचाराने हीन दर्जाचे असतात. अशा लोकांची मानसिकता आपण सुधारू शकत नाही. मग त्यांनी शिजवलेले अन्न देखील नकोच!

शीघ्रकोपी लोकांकडे जेवण टाळा. त्यांना कोणत्या गोष्टीचा राग कधी येईल सांगता येत नाही. रागाच्या भरात ते तुम्हाला भरल्या ताटावरून उठवायलाही कमी करणार नाहीत. चार चौघात अपमानित करतील. म्हणून अशा लोकांबरोबर जेवणे नको!

ज्यांना दुसऱ्यांप्रती सहानुभूती नाही, दया नाही, क्षमा नाही, शांती नाही अशा लोकांचे वाईट विचार अन्नात समाविष्ट होतात आणि ते अन्न ग्रहण केल्याने आपलीही मानसिकता तशीच बनत जाते. 

व्यसनी लोकांबरोबर जेवणे टाळा. तुम्ही व्यसनी नसलात, तरीदेखील व्यसनी लोक तुम्हाला व्यसन लावायला मागे पुढे पाहणार नाहीत. उलट तसे करणे त्यांना आणखीनच गौरवाचे वाटते. म्हणून अशा लोकांबरोबर जेवण आणि मैत्री टाळा.