शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ; भरघोस सुख-समृद्धी-भरभराट, कोणी करावे धारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2025 15:25 IST

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: ५ मुखी रुद्राक्षाचे महत्त्व अनन्य साधारण असून, रुद्राक्ष कोणासाठी उपयुक्त आणि लाभदायक ठरू शकतो? जाणून घ्या...

5 Mukhi Rudraksha Benefits In Marathi: भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये अनेक गोष्टींना अनन्य साधारण महत्त्व आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी करत असतो. अनेकदा प्रयत्न, मेहनत, परिश्रम घेऊनही म्हणावे तसे यश मिळतेच असे नाही. प्रगतीची संधी मिळतेच असे नाही. मग त्यासाठी काही उपाय केले जातात. केवळ यश-प्रगती, सुख-समृद्धीसाठी नाही, तर आराध्य देवतेचे, कुलदेवतेचे शुभाशिर्वाद लाभावे, भक्कम पाठबळ लाभावे, यासाठीही अनेक गोष्टी केल्या जातात. महादेव शिवशंकर यांच्या प्रतिकांपैकी एक असलेले रुद्राक्ष अतिशय पवित्र, शुभ-लाभदायक, पुण्य फलदायी मानले जाते. परंतु ते योग्य पद्धतीनेच धारण करावे, असे सांगितले जाते. अनेक मुखी रुद्राक्ष असतात. त्यापैकी ५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावे? ५ मुखी रुद्राक्षाचे लाभ काय? जाणून घेऊया...

भारतात रुद्राक्ष मणी धारण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून आहे. महादेव शिवशंकरांच्या अनेक प्रतिकांपैकी एक रुद्राक्ष आहे. रुद्राक्ष धारण करण्याचे केवळ सांस्कृतिक किंवा अध्यात्मिक नाही, तर आरोग्यदायी अनेक फायदे सांगितले जातात. भारतीय परंपरांमध्ये रुद्राक्षाचे विशेष महत्त्व आहे. रुद्राक्षाची उत्पत्ती भोलेनाथांच्या अश्रूंपासून झाली, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. प्रत्येक रुद्राक्षात भगवान शिव वास करतात, असे म्हटले जाते. रुद्राक्ष धारण केल्याने व्यक्तीला सकारात्मक ऊर्जा मिळते. शास्त्रांमध्ये १६ मुखी रुद्राक्षांचा उल्लेख आहे. काही रुद्राक्ष काळानुसार लुप्त झाल्याचे सांगितले जाते.

५ मुखी रुद्राक्षाचा महिमा अपार, मिळतात लाभच लाभ

रुद्राक्ष महादेवाचा अंश असल्याचे मानले जाते. हे कालाग्नीचे एक रूप मानले जाते, जे स्वतः रुद्र आहे. पंचमुखी रुद्राक्ष गुरु ग्रहाशी संबंधित असल्याचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रात, गुरु ग्रहाला समृद्धी, प्रगती, ज्ञान आणि भक्ती यांचा कारक मानले जाते. पंचमुखी रुद्राक्ष योग्यरित्या धारण केल्याने पंचब्रह्माचे विशेष आशीर्वाद मिळतात. पंचब्रह्मामध्ये भगवान गणेश, शिव, शक्ती, भगवान विष्णू आणि सूर्य देव यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्षात पाच रेषा असतात. या पंचदेवांचे प्रतीक मानल्या जातात. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने मानसिक शांतता मिळते. मन विचलित आणि अस्वस्थ राहत नाही. मनाचे स्थैर्य, शांतता आणि मानसिक बळ मिळण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो, असे सांगितले जाते. 

५ मुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा?

गुरु ग्रहाच्या अशुभ, प्रतिकूल प्रभावापासून दिलासा मिळण्यासाठी किंवा मुक्त होण्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष धारण करता येतो. ५ मुखी रुद्राक्ष परिधान केल्याने व्यक्तीच्या जीवनात स्थिरता आणि यश मिळते. पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, आम्लपित्त, निद्रानाश आणि श्वसनाच्या आजारांपासून आराम मिळण्यास मदत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. पंचमुखी रुद्राक्ष वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती आणण्यास उपयुक्त ठरतो, असे म्हटले जाते. वास्तविक पाहता, कोणीही ५ मुखी रुद्राक्ष धारण करू शकतो. पंचमुखी रुद्राक्ष गुरुदेवांशी संबंधित आहे. म्हणून, धनु आणि मीन राशीच्या लोकांनी ते घालणे अधिक फायदेशीर आहे. कारण या दोन्ही राशींचा स्वामी गुरु ग्रह आहे. तसेच, कला, संगीत, साहित्य, शिक्षक, तज्ज्ञ, पत्रकारिता या क्षेत्रातील लोक पंचमुखी रुद्राक्ष धारण करू शकतात.

५ मुखी रुद्राक्ष कसा धारण करावा? योग्य विधी कोणता?

महाशिवरात्रीला, पंचमी तिथीला, प्रत्येक महिन्याच्या शिवरात्रीला किंवा सोमवारी किंवा श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण करणे शुभ मानले जाते. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी चांदीच्या किंवा तांब्याच्या भांड्यात पंचामृत मिसळावे. नंतर या मिश्रणात रुद्राक्ष घालावा. यानंतर, १०८ वेळा ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि रुद्राक्ष धारण करावे. ही सोपी पद्धत झाली. परंतु, तज्ज्ञांचा योग्य सल्ला घेऊनच रुद्राक्ष धारण करावा. काही लोकांना विशिष्ट पद्धतीनेच, विशिष्ट वेळीच रुद्राक्ष धारण करण्याचा सल्ला काही वेळा दिला जातो. रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी भगवान शिवाच्या मूर्तीसमोर दिवा लावा आणि बेलपत्र अर्पण करावे. शिवपूजन केल्यानंतर मनोभावे रुद्राक्ष धारण करावा.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिक