शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

देव, देश, धर्माचे पालन करणार्‍या अहिल्यामाता होळकर यांची ३०० वी जयंती; वाचा त्यांचे महान कार्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 07:00 IST

व्यक्तीगत आयुष्यातील दु:ख पचवून होळकर शाहीची धुरा सार्थपणे पेलणार्‍या अहिल्यामाता होळकर यांच्या कार्याचा आढावा!

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

एक व्यक्ती सांसारिक दु:खाचे हलाहल पचवून, आप्तस्वकीयांची बंडखोरी सहन करून, स्वच्छ चारित्र्याने आदर्श राजकारणाचा परिपाठ घालून देते, तेव्हा ती 'पुण्यश्लोक' पदाला पोहोचते. हा खडतर प्रवास केला लोकमाता अहिल्याबाई होळकर यांनी! ३१ मे रोजी त्यांची ३०० वी जयंती आहे, त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा धावता आढावा!

चौंढे नावाच्या गावात एका धनगर कुटुंबात अहिल्या जन्माला आली. तिचे माता पिता ईश्वरभक्त होते. त्यामुळे बालपणापासून तिच्यावर अध्यात्माचे संस्कार झाले. अहिल्या महादेवाची भक्ती होती. इतर मुली भातुकली खेळत असताना, ती मात्र वाळुचे शिवलिंग बनवून मातीचा बेलभंडारा उधळत असे. 

अशी संस्कारीत सुकन्या तत्कालीन परंपरेनुसार बालवयातच होळकर घराण्याची सून झाली. अध्यात्माबरोबरच, शास्त्र व शस्त्र प्रशिक्षण घेऊ लागली. तिची जिज्ञासू वृत्ती हेरून तिच्या सासऱ्यांनी म्हणजेच मल्हारराव होळकर यांनी तिला राजकारणात सक्रिय ठेवण्यास सुरुवात केली. अहिल्येचा नवरा खंडेराव हा विलासी वृत्तीचा होता, परंतु तिच्या सहवासात राहून त्याच्यातही सुधारणा झाली. आपली निवड योग्य ठरल्याचा मल्हाररावांना आनंद झाला. अहिल्येचा संसार बहरला. मुक्ता आणि मालेराव अशी दोन अपत्ये झाली. मुक्ता आईच्या वळणावर तर मालेराव वडिलांच्या वळणावर होता.

सर्व काही सुरळीत असताना एक दिवस जाटांशी झालेल्या युद्धात खंडेरावाचा मृत्यू झाला आणि ऐन तारुण्यात अहिल्येवर वैधव्याचा प्रसंग ओढावला. तत्कालीन प्रथेनुसार ती सती जाऊ लागली, तेव्हा तिचे सासरे, मल्हारराव होळकर यांनी तिला हात जोडून विनवत म्हटले, `पोरी, तू सती जाऊ नकोस. माझी सून गेली आणि माझा खंडेराव माझ्या समोर उभा आहे असे मी समजतो. हे होळकर साम्राज्य तुला सांभाळायचे आहे. प्रजेला अनाथ करून जाऊ नकोस. सती जाण्याचा निर्णय रद्द कर!'

आपल्या पितासमान आणि गुरुस्थानी असलेल्या सासऱ्यांची आज्ञा शिरसावंद्य मानून, लोकनिंदेची पर्वा न करता अहिल्येने प्रवाहाविरुद्ध जाऊन सती जाण्याचा निर्णय रद्द केला. जनतेमध्ये तिच्या निर्णयाबद्दल संमिश्र भावना होत्या. अहिल्येने पती निधनाचे दु:खं बाजूला ठेवून राज्यव्यवस्थेची धुरा हाती घेतली. सर्व राज्यकारभार अहिल्येच्या हाती सोपवून मल्हाररावांनी राम म्हटला. आधी पती, मग पिता यांचे दु:खं कमी होते न होते, तोच काही काळात तिला पुत्रवियोगही सहन करावा लागला. तिचा पुत्र मालेराव व्यसनाधीन असल्याने दुर्धर आजाराने ग्रस्त होऊन अल्पवयात देवाघरी गेला.  अहिल्या एकटी पडली होती, पण...

तिने वैयक्तिक समस्या राज्यकारभाराच्या आड कधीच येऊ दिल्या नाहीत. उत्तम न्यायव्यवस्था, परराष्ट्रीय धोरण, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, सैन्यव्यवस्था ती एकहाती उत्तररित्या सांभाळत होती. आदिवासी, नक्षलवादी लोकांशी चर्चा मसलत करून तिने त्यांनाही न्याय मिळवून दिला, त्यामुळे ती जनताही भारावून अहिल्येला `अहिल्यामाता' संबोधू लागली. 

अशातच मुक्तेचा विवाह झाला, तिला पुत्र झाला. उतारवयात अहिल्या नातवात रमू लागली. पण तेही सुख क्षणभंगूर ठरले. तापाचे निमित्त होऊन नातू नत्थू देवाघरी गेला. तो धक्का सहन न होऊन त्याचे वडील गेले आणि पिता-पुत्र वियोग सहन न होऊन मुक्ता सती गेली. पाच मृत्यू पचवून अहिल्या एकाकी पडली.

याच प्रसंगाचा फायदा घेत राघोबा दादा होळकर साम्राज्य काबीज करण्यास आले. तेव्हा अहिल्येने व्यवहारचातुर्य दाखवून राघोबादादांना पत्रातून लिहिले, 'तुम्ही आमचा पराभव केलात, तर नवल नाही, पण आमच्या महिला सैन्याने जर तुमचा पराभव केला, तर तुम्ही कुठेही तोंड दाखवू शकणार नाही.' या शब्दांची जरब एवढी की राघोबादादा परस्पर पसार झाले.

होळकर आडनाव असलेल्या तुकाराम नावाच्या शूर योध्याच्या हाती होळकर साम्राज्याची सूत्रे सोपवून अहिल्या मातेने राज्यकारभारातून निवृत्ती घेतली. पूर्णवेळ ईश्वरकार्याला समर्पित केले. पुरातन मंदिरांची डागडुजी केली, जिर्णोद्धार केला, नद्यांवर घाट बांधले, न्यायालये उभारली, अन्नछत्रे सुरू केली, पूजापाठ, वेदपठन, वेदअध्ययनास प्रोत्साहन दिले. मुख्य म्हणजे हे सर्वकाही शासकीय खर्चातून नाही, तर स्वखर्चातून केले आणि आपल्या संपत्तीचे दान करून आपण वैरागी आयुष्य निवडले.

देवाला आणि दैवाला दोष न देता प्राप्त परिस्थितीचा सामना करून सामान्य स्त्री ते असामान्य सम्राज्ञी असा खडतर प्रवास पुण्यश्लोक अहिल्या मातेने केला. आज त्यांची ३१ मे रोजी जयंती, त्यानिमित्त त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन!