शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

२०२५ पहिली संकष्ट चतुर्थी शुक्रवारी: गणपतीसह करा लक्ष्मी पूजन; बुद्धी-समृद्धी-सुख लाभेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 10:44 IST

2025 First Paush Sankashti Chaturthi January: २०२५ची संकष्ट चतुर्थी शुक्रवारी येत असल्याने गणपतीसह लक्ष्मी देवीची पूजा करणे शुभ-लाभदायी आणि पुण्य-फलदायी मानले गेले आहे.

2025 First Paush Sankashti Chaturthi January: सन २०२५ ची सुरुवात झाली असून, व्रत-वैकल्ये, सण-उत्सव उत्साहात साजरे केले जात आहेत. सन २०२५ मधील पहिली संकष्ट चतुर्थी शुक्रवार, १७ जानेवारी रोजी आहे. पहिली संकष्टी शुक्रवारी आली असल्याने या दिवशी गणपती बाप्पासोबत देवी लक्ष्मीचे पूजन करणे शुभ-लाभदायक, पुण्य-फलदायी मानले गेल्याचे सांगितले जात आहे. 

गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत! तो समरांगणात अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोड-धोड आवडीने खाणारा, शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा असा देव आहे. गणपती बुद्धीची देवता आहे. गणपती ही वैश्विक देवता आहे. गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे. विविध कलांच्या अविष्काराने सर्वांशी खुला संवाद साधणारे आणि सर्वांना आपलेसे वाटणारे हे दैवत. पराक्रमी असले तरी कोपिष्ट नाही, तेजस्वी असले तरी तापहीन असे हे दैवत. यामुळेच देवत्व असलेला गणपती जवळचा आणि आपल्यातलाच वाटतो. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करण्याची प्राचीन परंपरा आजही सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रथमेश गणपती आणि लक्ष्मी देवीचे पूजन अनेकार्थाने विशेष मानले गेले आहे.

लक्ष्मी चंचल असते. ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही

लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक आहे. लक्ष्मी विष्णूची पत्नी आहे, लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. धन, संपत्ती, पैसा म्हणजे लक्ष्मी होय. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की लक्ष्मी कायम आपल्यासोबत राहावी. धनसंपत्ती मिळविणे हाच बहुतेकांचा उद्देश असतो. लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल, तर कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अडचणींना सहज तोंड देता येईल. परंतु लक्ष्मी चंचल असते. ती फार काळ एका ठिकाणी थांबत नाही असे सांगितले जाते. तर, भगवान गणेश बुद्धी देतात. तो विघ्नांचा नाश करणारा आणि विघ्नेश्वर आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे निःसंशयपणे भरपूर संपत्ती असेल परंतु बुद्धीची कमतरता असेल तर तो कधीही त्या संपत्तीचा योग्य वापर करू शकणार नाही. यामुळेच कोणत्याही व्यक्तीने हुशार आणि विवेकी असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यक्तीमध्ये हे दोन गुण असतील त्यालाच पैशाचे खरे महत्त्व कळू शकते. म्हणूनच गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा केली जाते. एकीकडे श्रीगणेश बुद्धी देतात, तर दुसरीकडे देवी लक्ष्मी संपत्ती, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, वैभव देते, असे मानले जाते. गणपती आणि देवी लक्ष्मीची एकत्र पूजा करण्याचे महत्त्व अनेक कथांमधून सांगितले आहे.

शुक्रवारी संकष्ट चतुर्थीला कसे करावे लक्ष्मी पूजन

आपापल्या कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे देवी लक्ष्मीचे पूजन करावे. सकाळी नित्यकर्म आटोपल्यानंतर गणेश पूजनासह लक्ष्मी देवीचीही पूजा करावी. पंचोपचार किंवा षोडषोपचार पद्धतीने पूजन करता येऊ शकते. संकष्टीला अनेक घरांत गणपती बाप्पावर अभिषेक केला जातो. यावेळी गणपती अथर्वशीर्षाची पारायणे केली जातात. यासोबतच शक्य असेल, तर लक्ष्मी देवीचे श्रीसूक्त स्तोत्र म्हणता येऊ शकेल. श्रीसूक्त पठण शक्य नसेल, तर लक्ष्मी देवीचे अन्य स्तोत्र, श्लोक आवर्जून म्हणावेत.  लक्ष्मी देवीला कमळाचे फूल किंवा आवडती फुले अर्पण करावीत. तसेच लक्ष्मी देवीच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. गणपतीसह लक्ष्मी देवीची आरती करावी. संकष्टीच्या दिवशी ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा १०८ वेळा जप केला जातो. यासह लक्ष्मी देवीच्या प्रभावी मंत्रांचा जप अवश्य करावा, १०८ वेळा शक्य नसेल, तर यथाशक्ती करावा. मनोभावे नमस्कार करून प्रसाद ग्रहण करावा.

दरम्यान, तिन्हीसांजेला दिवेलागणीची वेळ झाली की, लक्ष्मी देवीसमोर दिवा लावावा. तुळशीसमोर दिवा लावावा. लक्ष्मी देवीचे मनोभावे नामस्मरण, जप करावा. एखादा गोड पदार्थ लक्ष्मी देवीला अर्पण करावा. यानंतर चंद्रोदयाची वाट पाहावी. चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला अर्घ्य द्यावे. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती 2024Puja Vidhiपूजा विधीspiritualअध्यात्मिक