शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संचारबंदीमध्ये नक्की करा 'या' १० गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 16:23 IST

आपण या संचारबंदीच्या काळात घरी असतांना, स्वतःला वृद्धिंगत करण्याची आणि स्वत:च्या अंतरंगाचा ठाव घेण्याची ही उत्तम वेळ आहे. या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी सद्गुरू घरी करण्याजोग्या १० सोप्या गोष्टी इथे संगत आहेत.

१. कृतज्ञता व्यक्त करा, अगदी मनापासून

सद्‌गुरु: मला वाटते की या देशात इतरांना कृतज्ञतेची पोचपावती देण्याची वृत्ती आपल्याकडे नाही आहे. दुर्दैवाने आपल्याला असे वाटते की टीका करून सगळ्या गोष्टी ठीक करता येऊ शकतात. हे थांबायला हवं. अनेक लोक करत असलेल्या कितीतरी अद्भुत गोष्टीं आपण ओळखायला हव्या आणि त्याबद्दल आपली कृतज्ञता देखील व्यक्त करायलाच हवी.

आपण बस मध्ये जातो तेव्हा आपल्यापैकी किती जण ड्रायव्हरला किवा कंडक्टरला बघून ‘धन्यवाद’ म्हणतात किंवा किमान ‘नमस्कारम’ तरी म्हणतात? हे अधिकांश लोकांमध्ये आढळून येत नाही. पूर्वीच्या काळी आपली संस्कृती अशी होती की जिथे एखाद्या लहान गोष्टीसाठी सुद्धा आपण देणार्‍याला वाकून नमस्कार करायचो; पण ते सगळं आता नाहीसं झालं आहे. सद्यस्थितीत वैद्यकीय कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणारे इतर बरच लोक स्वत:चा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालत आहेत. ते रुग्णालयात काम करतात आणि मग घरी जातात त्यामुळे प्रत्यक्ष मृत्यूच कदाचित ते घरी नेत असतील. ते लोक अशी सेवा देत असतांना जर आपण त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करत नसू तर ती अतिशय वाईट गोष्ट आहे.

या सगळ्यातून आपण बाहेर पडे पर्यंत, कदाचित पुढचे कमीतकमी सहा महीने, रोज सकाळी उठल्या नंतर “स्वत:चा जीव धोक्यात घालणार्‍या या सर्व लोकांप्रती आम्ही खरोखरच कृतज्ञ आहोत” असा एक विचार तुम्ही तुमच्या मनात निर्माण करा.

२. तुमची श्वसनव्यवस्था तपासण्यासाठी रोज “सिंह क्रिया” करा

सिंह क्रिया ही फार सोपी क्रिया आहे. तुमच्यापैकी ज्यांना शक्ति-चालना क्रिये सारखी कुठली शक्तीशाली क्रिया येत नाही त्यांच्यासाठी ही क्रिया उपयुक्त ठरेल. ती तूमच्या फुफ्फुसांची क्षमता वाढवेल आणि तुमची प्रतिकरशक्ती सुद्धा! आणि त्याहीपेक्षा, तुम्ही पाच दिवस ही क्रिया लगतार करू शकलात आणि सहाव्या दिवशी तुम्हाला ती करतांना अचानक त्रास व्हायला लागला तर त्याचा अर्थ तुमच्यामधे श्वसनाशी संबंधीत काहीतरी समस्या निर्माण झाली आहे. ती कोणतीही समस्या असू शकते, कोरोना विषाणूच असेल असे नाही. ती कुठलीही असू द्या, जर अचानक एक दिवस तुम्हाला ही क्रिया करणं जमलं नाही तर तुम्ही स्वत:ची तपासणी करून घ्यायलाच पाहिजे. विशेषत: वैद्यकीय कर्मचारी, पोलिस किंवा इतर लोक जे अश्या कुठल्यातरी आवश्यक सेवा प्रदान करत आहेत आणि संसर्ग झालेल्या लोकांना सामोरे जात आहेत त्यांनी कृपा करून ही क्रिया करायलाच हवी. तुमच्यासाठी ती फार उपयुक्त ठरेल.३. ‘डेथ बूक’ (Death Book) एका बैठकीत वाचून काढा

आज विविध मार्गांनी संपूर्ण जगाला आपल्या मर्त्य किंवा नश्वर असण्याची आठवण प्रकर्षाने होत आहे. पण नश्वरता ही नेहमीच आपल्या सोबतीला आहे. तर, हे पुस्तक आहे जे मरू शकतात अश्या सर्वांसाठी – आपल्या जीवनाचा हा अत्यंत महत्वाचा पैलू त्याच्या निर्भेळ स्वरुपात तुम्हाला समजून घेता येण्यासाठी. सहसा, जेव्हा कोणी मरतो तेव्हा आपणा तो स्वर्गवासी झाला असं म्हणतो – ही भेसळ झाली. तुम्ही सजगपणे मरायला हवं - मरण हे जीवनाचाच एक भाग आहे ही गोष्ट समजून घेऊन; आपण स्वर्गात चाल्लोय या विचारातून नव्हे. तुम्हाला असं वाटत असेल की आपण स्वर्गात जाणार आहोत तर तुम्ही मृत्यूबद्दल अतिशय उत्कट भावना बाळगायला लागाल, ते चांगलं नाही. उत्कट भावना जीवनाबद्दल असला हव्या; मृत्युला मात्र तुम्ही निस्पृह आणि निर्विकारपणे हाताळायला हवं.

या पुस्तकची रचना अश्या पद्धतीने करण्यात आली आहे की त्यामध्ये मृत्युच्या सगळ्या पैलुंकडे ते जसे आहेत तसंच (शुद्ध स्वरुपात) त्यांच्याकडे बघण्यात आलंय. वाचक त्याच्या शेवटाकडे पोहोचेपर्यंत मृत्युच्या बाबतीत पूर्वीपेक्षा थोडे अधिक निर्विकार व्हायला हवे.

हे असं पुस्तक आहे की तुम्ही ३० दिवसात थोडं-थोडं करून वाचलं तर तुम्हाला ते पुस्तक काय आहे याची जाणीव कदाचित होणार नाही. तुम्ही जितकं शक्य असेल तितकं एकाच बैठकीत ते वाचायला हवं जेणेकरून ते एक मोठा गोळा बनून तुमच्यामध्ये शिरेल, मग हळू हळू तुम्ही ते पचवायचं. इतर कुठल्या वेळी तुम्हाला सलग २-३ आठवडे नुसतं बसून वाचन करायला मिळतील का? त्यासाठी हीच सर्वोत्तम वेळ आहे. नश्वरता आपल्याकडे डोळे वाटारून बघते आहे.

४. ‘सोशल मीडिया’ जबाबदारीने वापरा

या संचरबंदीच्या काळात आपण ‘सोशल मीडिया’ वर एकमेकांविरुद्ध विष न ओकता ते जास्त जबाबदारीने वापरायला शिकू शकतो. ही एक गोष्ट आपण नक्कीच करू शकतो कारण हा विषाणू आपल्याला मृत्यू देतोय, तेव्हा दूसार्‍यांवर सतत शाब्दिक सुरे चालवू नका. या दिवसांमध्ये आपण लोकांशी ज्या काही माध्यमातून संपर्क साधू शकतो – शरीरिक स्पर्श न करता, थोड्या अंतरावरून – त्या सर्व माध्यमांचा उपयोग आपण आपलं प्रेम, करुणा, सौजन्य, हळुवारपणा आणि आपली मानवता व्यक्त करण्यासाठी करू या. मला असं लक्षात येतंय की एक देश म्हणून आपण आपल्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये, शासन व्यवस्थेमध्ये, राज्यकारभारामद्धे पळवाटा, त्रुटि शोधण्यात गुंतलेले आहोत. हो, तेही महात्वाच आहे पण ही वेळ त्या गोष्टींसाठी योग्य नाही. ही वेळ ज्या गोष्टी केल्या जात आहेत त्यांची कदर करण्याची आणि योग्य ती प्रशंसा करण्याची आहे.

५. घरी सुद्धा “सोशल डिस्टंस” पाळा

मनुष्य समाजासाठी हा जबाबदारीने वागण्याचा आणि आपापसात भौतिक अंतर ठेवण्याचा काळ आहे. याचा अर्थ आपण बाहेरच्या लोकांपासून अंतर ठेवायचं पण आपल्या खोलीमध्ये किंवा घरामद्धे मात्र पार्टी करायची असा नाही. आपण इतरांपासून भौतिक अंतर ठेवायला हवं. आपण हे सुनिश्चित करायला हवं की समजतील, घरातील, आपल्या कुटुंबातील विशेष संवेदनशील लोकांच्या – आपले आई-वडील, आजी-आजोबा – यांच्या आसपास २ मीटर परिघात कोणीही जाता कामा नये. येवढं जर तुम्ही करू शकलात तर या परिस्थितीतून आपण कमीतकमी नुकसान सोसून बाहेर पडू.

६. तुमची रोग प्रतिकारशक्ति वाढवा

या क्षणी तुमच्या रोग प्रतिकारशक्तिला थोडं वाढवण्याची गरज आहे कारण तीच हे ठरवणार आहे की हा विषाणू प्राणघातक ठरेल, भरपूर नुकसान करेल की काही सौम्य लक्षणं दाखवून तुमच्यातून निघून जाईल. तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी तुम्ही बर्‍याच गोष्टी करू शकता.

इथे काही टिप्स बघा ८ टिप्स : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी

७. केवळ ‘असणं’ शिका

आपण या विषाणूचे वाहक आहोत. हीच समस्या आहे पण तीच एक अनुकूल गोष्ट सुद्धा आहे कारण आपण मानव आहोत. या क्षणी, आपण आपल्या मनाशी ठरवलं पाहिजे – आपण मानव आहोत की निव्वळ जीवजंतु किंवा पशू आहोत? आपण मानव असू तर आपण कसं असायला हवं ते आपल्याला कळायला हवं. आपण कसं असावं हे जर आपल्याला माहीत असेल तर आपल्यापासून आणखी एकाला आणि त्यापासून आणखी एकाला संक्रमण होणार नाही याबद्दलचे नियम पाळणं सहज शक्य होईल. आपण कसं असावं हे जर आपल्याला माहीत असेल तर सामाजिक व्यवहार आपण निवडकपणेच करू. त्याची आवश्यकता नसेल तर आपण आपल्याशीच शांत राहू. काहीही न करता जगासाठी खूप अद्भुत काहीतरी करत असल्याचं समाधान तुम्ही अनुभवू शकता.

योगाचं एक अंग आहे – प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे जगाच्या व्यवहारात गुंतलेल्या तुमच्या इंद्रियांना अंतर्मुख करणे. याचा प्रयोग करण्याची ही उत्तम वेळ आहे. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रशिक्षणाची गरज नाही. फक्त डोळे बंद करून बसा. तुम्हाला शक्य होईल तितके तास बाहेरच्या जगासोबत गुंतू नका. सुरवातीला तुमचं मन सगळीकडे भटकायला लागेल. ठीक आहे, त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका; त्याला जिथे जायचं आहे तिथे जाऊ द्या. तुमचे डोळे बंद ठेवा, कुठेही बघू नका. सुरवातीला एक तास मग दिवसातून सहा ते बारा तासांपर्यंत तसेच रहा; तुम्हाला लक्षात येईल की उच्यतम पातळी गाठण्याइतकी ऊर्जा तूमच्यामध्ये आहे.

८. स्वत:मधे रोज थोडी सुधारणा करा

पुढच्या काही आठवड्यात शरीरिकदृष्ट्या पूर्ण करता येईल असं एखादं लहान ध्येय निश्चित करा. तुम्ही अठरा वर्षांचे होता तेव्हा खाली वाकल्यावर कुठपर्यंत जाऊ शकतं होतात? त्यावेळी कदाचित तुमचे हात जमिनीवर पूर्ण टेकू शकतं असतील, पण आज कदाचित फक्त टोंगळ्यांपर्यंतच जाऊ शकतात. आता त्यापेक्षा ६ इंच जास्त खाली वाकता येईल का ते बघा.

तुम्ही अठरा वर्षांचे होता तेव्हा किती झटपट पायर्‍या चढून जाऊ शकतं होता आणि आता कसे धापा टाकत चढत आहात. त्यामध्ये दहा ते वीस टक्के सुधारणा करता येईल का ते बघा.

जरा बघा, तुम्ही अठरा वर्षांचे किंवा त्यापेक्षा लहान होते तेव्हा तुम्ही कसे ताठ बसत होता; आणि तेच जर आता तुम्ही जरा पोक काढून बसत असाल तर ते थोडं सरळ करा.

अजून थोडं मागे जाऊन बघा की जेव्हा तुम्ही सहा, आठ किंवा दहा वर्षांचे होतात तेव्हा तुमचं हास्य किती गोड होतं. ते ५०% तरी आपल्याला परत आपल्या चेहर्‍यावर आणता येऊ शकेल का ते बघा - नुसतंच कृत्रिम हास्य नाही तर पूर्वीची तीच किमया तुमच्यामध्ये परत आणा.

खूप अद्भुत असं काही करणं जमत नसेल तर तुम्ही या पृथिवर किमान एक आनंदी जीवन तरी असलंच पाहिजे. स्वत:ला आणि तुमच्या भोवतीच्या इतरांना किमान इतकं तरी तुम्ही देणं लागता. तुम्ही स्वत:चं असं खास ध्येय ठरवू शकता. हे कठीण नाहीये, फक्त जरा लक्ष देण्याची गरज आहे.

९. तुमच्या भोवतालच्या किमान २ गरजू व्यक्तींचा आधार बना

या विषाणू मुळे निर्माण झालेली एक मोठी चिंता गरीब आणि दैनिक वेतन असलेल्या कामगार वर्गाची आहे. सुदैवाने भारत सरकारने शेतकरी, कामगार आणि मजूर लोकांसाठी तीन महीने आधार देऊ शकेल असं एक पॅकेज बनवलं आहे. याचा अर्थ असा आहे की या लोकांना किमान भुखमारीला तरी सामोरे जावे लागणार नाही.

असं असूनही काही लोकांपर्यंत कदाचित ही सेवा पोचणार नाही. फक्त लोकसमूहच अश्या लोकांची मदत करू शकतो. तुम्ही जिथे असाल तिथे...मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो: आपण स्वत:ला असं वचन देऊ या की भूक हे दू:खाचं आणि मृत्युचं कारण आपण ठरू देणार नाही. जर कोणी तशा परिस्थितीचा सामना करताना दिसला तर आपण त्यांना आधार कसा देऊ शकू हे बघायलाच हवं – आपल्या स्वत:च्या हिमतीवर किंवा किमान इतरांच लक्ष त्यांच्याकडे वेधून. तशीच परिस्थिति असेल तर माझी सगळ्या स्वयंसेवकांना ही कळकळीची विनंती आहे की त्यांनी किमान दोन व्यक्तींचा आधार बनावं. पहिले दोन आठवडे कदाचित सगळं ठीक राहील पण तिसर्‍या आठवड्यापासून लोकांचा त्रास खूप वाढू लागेल. आपण त्यांची काळजी घ्यायला हवी.

१०. उत्साहात रहा, उदास नाही

कोरोनाने मनुष्य जीवन किती तकलादू आणि नाजुक आहे याची जाणीव आपल्याला करून दिलेली आहे – एक अदृश्य, अतिसूक्ष्म प्राणी आपलं जीवन संपवू शकतो आणि आपण जे काही बनवलं ते सगळं विस्कळीत करू शकतो. बाहेर आधीच खूप सार्‍या समस्या आहेत, आपण आपलं जीवन सुद्धा यातनदायक बनवायला नको. आपण दू:खाच कारण बनायला नको. आपण आनंदी, उत्साही असणं आणि दुसर्‍याचा आधार बानणं हेच या क्षणी सगळ्यात महत्वाचं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या