शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
3
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
4
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
5
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
6
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
7
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
8
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
9
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
10
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
11
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
12
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
13
Sonam Raghuwanshi: १८ मिनिटांत राजाची हत्या अन् उचलून फेकले दरीत, सोनम 'या' व्यक्तीसोबत स्कूटरवरून झाली फरार
14
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
15
क्षण आनंदाचा! IPS वडिलांचा IAS लेकीला सॅल्यूट; पाणावले डोळे, अभिमानाने भरून आला ऊर
16
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
17
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
18
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
19
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
20
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती

'झेडपी' शिक्षिकेचा जगात बोलबाला; पाकिस्तानसह तीन देशांतील विद्यार्थ्यांना देतेय ऑनलाईन धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2022 01:13 IST

चार वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पंधराशे व्हिडिओ निर्माण केले असून देशभरासह इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ येथील सबस्क्राईबर आहेत.युट्यूबवरील व्हिडिओतून १८ कोटी विद्यार्थ्यांनी घेतले धडे

बीड : ऊसतोड मजुरांची मुलं आणि शिक्षणापासून दुरावलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, बीड जिल्ह्यातील एका शिक्षिकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून जिल्ह्यातच नाही. तर जगभरात नावलौकिक केलंय. बीड जिल्ह्यातील ढेकनमोहा जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचे धडे देणाऱ्या या शिक्षिका आहेत, उषा ढेरे. यांची चर्चा सध्या जिल्ह्यातच नाही तर जगभरात होतेय. त्यांच्या शिक्षण विषयक व्हिडीओतून भारतासह इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ येथीलही लाखो विद्यार्थी ऑनलाईन धडे गिरवत आहेत.

चार वर्षांपूर्वी निर्माण केलेल्या युट्युब चॅनलच्या माध्यमातून त्यांनी पंधराशे व्हिडिओ निर्माण केले. या चॅनलला जगभरातून जवळपास साडेचार लाखांहून अधिक सबस्क्रायबर आहेत. आतापर्यंत देश-विदेशातील 18 कोटी 70 लाख विद्यार्थ्यांनी हे व्हिडीओ पाहिले आहेत. ऑनलाईन शिक्षणाच्या या संकटातही संधी शोधण्याचं काम उषा ढेरे यांनी करून दाखविले आहे. कोरोना काळात शाळा बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. अशातच त्यांनी निर्माण केलेल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न सुरू केला. शाळा बंद असताना शिक्षणासाठीचे त्यांनी केलेले काम नेत्रदीपक ठरत आहे. समाज शास्त्र आणि इंग्रजी मध्ये एमए झालेल्या उषा ढेरे यांनी स्टडी फ्रॉम होमच्या काळात आपले काम अत्यंत प्रामाणिक आणि सक्षमतेने केले.

उषा ढेरे यांचे प्राथमिक शिक्षणाचे जवळपास पंधराशे व्हिडिओ युट्युब वर अपलोड आहेत. या व्हिडिओला आतापर्यंत 16 कोटी 67 लाख एवढे व्ह्यूज मिळाले आहेत. राज्यातल्या गावागावातील विद्यार्थ्यांनी या व्हिडिओतून आपले शिक्षण सुरू ठेवले. याशिवाय इंडोनेशिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळ येथील सबस्क्राईबर आणि व्ह्युवर्स या व्हिडिओला लाभले आहेत. समाजातील प्रत्येक विद्यार्थांना प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण घेता यावं. यासाठी या दोन्ही शिक्षिका प्रयत्न करत आहेत. उषा यांच्या सहशिक्षक असणाऱ्या सुनीता जायभाय यांनी देखील प्रत्यक्ष कृतीतून व्हिडिओ करून हे व्हिडिओ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या प्रयत्नाने या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागली आहे. 

या दोघींच्या ही कार्याच सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.उषा ढेरे यांच्याप्रमाणेच इतर शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा असा वापर करून प्रयत्न केला. तर नक्कीच दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात येण्यास मदत होईल, त्यामुळे इतर शिक्षकांनी असे कार्य हाती घेणे गरजेचंच आहे.

टॅग्स :Educationशिक्षणYouTubeयु ट्यूबBeedबीडTeacherशिक्षक