शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

विविध कामांच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 23:57 IST

बीड : जिल्हापरिषदेच्या माध्यमातून करण्यात येणाºया विविध कामांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करुन सदस्यांनी जी.प.च्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ...

ठळक मुद्देबीड जिल्हा परिषदेची या ‘टर्म’ मधील शेवटची सभा : सदस्यांची लक्षणीय उपस्थिती

बीड : जिल्हापरिषदेच्या माध्यमातून करण्यात येणाºया विविध कामांच्यासंदर्भात प्रश्न उपस्थित करुन सदस्यांनी जी.प.च्या सर्वसाधारण सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. सोमवारी या ‘टर्म’मधील शेवटची सर्वसाधरण सभा असल्यामुळे जि.प.सदस्यांची उपस्थिती देखील यावेळी लक्षणीय होती.जिल्ह्यात ४० नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झालेल्या आहेत, परंतु उपलब्ध निधीइतकेच दायित्व असताना नियमांना डावलून ११ योजनांचे कायार्रंभ आदेश दिलेच कसे? असा सवाल करत जिल्हा परिषद सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धरले. तर हंगामी वसतिगृह कारखान्यावरील लोकं परत आल्यावर सुरू करणार आहात काय, असा सवाल करून जि.प.सदस्य अ‍ॅड.प्रकाश कवठेकर यांनी केला. अधिका-यांकडून चुकीची कामे होत असल्याच्या कारणावरून सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन विभागाच्या सभागृहात सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षा सविता गोल्हार, उपाध्यक्षा जयश्री मस्के, सीईओ अजित कुंभार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती. दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान सर्वसाधारण सभेला सुरुवात झाली. यावेळी अ‍ॅड. प्रकाश कवठेकर यांनी 'माज्या जिल्हा परिषद गटातील ७० टक्के लोक ऊसतोडीसाठी जात असून त्यांच्या पाल्यांसाठी वेळेत हंगामी वसतिगृह सुरू होणे आवश्यक होते., परंतु प्रशासनातील कामचुकार अधिकारी, कर्मचाºयांमुळे ती प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. जर विद्यार्थ्यांची गैरसोय होत असेल तर त्यांनी इथे कोणाच्या भरवशावर राहायचे. अधिका-यांनी ग्रामीण भागात जाऊन वस्तुस्थिती पाहिली पाहिजे, त्याशिवाय त्यांना ते दु:ख कळणार नाही' असे म्हणत वसतिगृहांचा विषय मांडला. याचबरोबर हंगामी वसतिगृह योजना २०१७- १८ मध्ये ज्या हंगामी वसतिगृहाचे पैसे दिलेले नाहीत, अशांचे पैसे तत्काळ देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली.अशोक लोढा यांनी जिल्ह्यात नव्याने मंजूर असलेल्या ४० पाणीपुरवठा योजनांचा विषय मांडत या कामांसाठी ३० कोटी रुपये उपलब्ध आहेत. परंतु जुन्या योजनांचे दायित्वही तितक्याच प्रमाणात असल्याने नवीन योजनांना कायार्रंभ आदेश देता येत नाही. जुणे देणे असतानाही अधिकाºयांनी वरिष्ठांकडे चुकीची माहिती पाठवून यातील ११ योजनांना कायार्रंभ आदेश दिले आहेत.यात माजलगाव: नित्रुड, वडवणी: चिंचाळा, धारूर: पांगरी, अंबाजोगाई: लिमगाव, अंबाजोगाई: हिवरा बु., आष्टी: हातोला, परळी: मांडवा आणि अन्य तीन कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झालेली आहे. यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी केली. तसेच बीडसह इतर पंचायतसमितीच्या माध्यमातून कामे होत नसल्याचा देखील विषय यावेळी घेण्यात आला. दरम्यान सर्व पंचायतसमितीमधून कामे सुरु करण्याची मागणी यावेळी सदस्यांनी केली.

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषद