शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:27 IST

बहिणीसोबत प्रेम करून नंतर विवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने मित्राच्या सहाय्याने मेहुण्याचा काटा काढला. हा थरार बीड शहरातील तेलगाव नाक्यावर बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला.

ठळक मुद्देबीडमधील तेलगाव नाक्यावरील थरार : मुलीचा भाऊ व त्याच्या मित्राने धारदार शस्त्राने केले सपासप वार

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बहिणीसोबत प्रेम करून नंतर विवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने मित्राच्या सहाय्याने मेहुण्याचा काटा काढला. हा थरार बीड शहरातील तेलगाव नाक्यावर बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झालेली नव्हती. दरम्यान जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईकांनी हंबरडा फोडला. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.सुमित वाघमारे (वय २५, रा. तालखेड, ता. माजलगाव ह. मु. नागोबा गल्ली, बीड) असे मयताचे नाव आहे. सुमित हा आदित्य इंजिनिअरींग महाविद्यालयात अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. याच वर्गात सदर मुलगी शिकत होती. या दोघांची मैत्री झाली. मैत्रीतून प्रेम आणि नंतर दीड महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. हा विवाह तिच्या भावाला खटकला होता. त्यामुळे त्याच्या मनात सुमितबद्दल राग होता. याबाबत त्यांच्यात अनेकदा वादही झाले. बुधवारी सदर मुलगी व तिचा पती सुमित दोघहीे परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयात गेले होते. परीक्षा देऊन सायंकाळी दुचाकीवरून घरी परतत असतानाच महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पांढऱ्या कारमधून(एमएच २३ - ३२५३) तिचा भाऊ बालाजी लांडगे व त्याचा मित्र संकेत (पूर्ण नाव कळू शकले नाही) हे दोघे आले व कारमधून उतरत त्यांनी सुमितवर धारदार शस्त्राने सपासप वार केले आणि कारमध्ये बसून सुसाट निघून गेले, असे सदर मुलीने संगितले. ओरडत तिने मदतीची मागणी केली, दरम्यान एका रिक्षाचालकाने धाव घेत सुमितला रिक्षात घालून जिल्हा रूग्णालयात आणले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झालेला असल्याने त्याचा वाटेतच मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. ही माहिती वाºयासारखी नातेवाईक व मित्रांना समजली. त्यांनी जिल्हा रूग्णालयात गर्दी केली. सुमितची पत्नी, आई व मावशीने रूग्णालयात आल्यावर हंबरडा फोडला. यामुळे वातावरण सुन्न झाले होते. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणाची नोंद पेठ बीड ठाण्यात झालेली नव्हती.तालखेडमध्ये गाव जेवणमुलीच्या घरच्यांनी लग्नाला विरोध केल्याने त्यांनी ‘कोर्ट मॅरेज’ केले. त्यानंतर तालखेडला गावी जात ग्रामस्थांना जेवण दिले. त्यानंतर ते पुन्हा बीडमध्ये वास्तव्यास आले. सुमित हा जालना रोडवरील एका दुकानात कामाला.आरोपींच्या शोधात पथकेघटनेनंतर पेठबीड, शिवाजीनगर आणि शहर पोलिसांचे पथक नियुक्त केले. ते तात्काळ आरोपीच्या शोधासाठी रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात होता. रात्री ७.३० पर्यंत आरोपी मिळालेले नव्हते. आरोपींना लवकरच अटक करू, असे उपअधीक्षक खिरडकर यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी