शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 16:30 IST

पैठण-बारामती रोडवरील चोभानिमगांव येथील घटना 

कडा ( बीड ) :  कडा येथील काम आटोपून चोभानिमगाव येथील घराकडे दुचाकीवरून परतणाऱ्या एका युवकाचा अपघातीमृत्यू झाल्याची घटना चोभानिमगाव परिसरात मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विकास दीपक शिंदे ( २३) असे मृत युवकाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील चोभानिमगाव येथील विकास शिदे हा मंगळवारी कामानिमित्त दुचाकीवरून ( एमएच १७ एस ५४०८ ) कडा येथे आला होता. काम संपल्यानंतर विकास दुचाकीवरून रात्री ८ वाजेच्या सुमारास घराकडे परत निघाला. दरम्यान, पैठण-बारामती रोडवरील चोभानिमगाव परिसरात विकास आला असता त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या विकासाचा जागीच मृत्यू झाला.

ऊसतोड मजुरांच्या वाहनाला अपघात; दोन ठारधारूर (जि. बीड) : तालुक्यातील कोयाळ येथून ऊसतोडणी मजुरांना घेऊन निघालेली जीप उलटून दोघे ठार झाले तर पाच जण जखमी झाले. ही घटना परळी तालुक्यातील सरफराजपूर येेथे सोमवारी रात्री साडेआठ वाजता घडली. विशाल गौतम वाव्हळे (१८) व वैजनाथ रामा वाव्हळे (६५, दोन्ही रा. कोयाळ) अशी मृतांची नावे आहेत. बाळासाहेब कोंडीबा मुंडे (३५), विश्वनाथ बालाजी वाव्हळे (५०), रमेश भगवान मुंडे (३४, सर्व रा. कोयाळ), अरुण नामदेव गायकवाड (६०), शोभा गायकवाड (५५, दोन्ही रा. तळेगाव), अनिता संजय डोंगरे (४०) आणि संजय दासू डोंगरे (५०, दोन्ही रा. हिंगणी) यांचा जखमींत समावेश आहे. अपघातानंतर कोयाळ ग्रामस्थांनी जखमींना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी बाळासाहेब मुंडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना लातूरला हलवण्यात आले आहे. इतरांवर अंबाजोगाईत उपचार सुरू आहेत.

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडDeathमृत्यू