शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तरूण तडफडून मेला, पण सर्जन आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 15:47 IST

Beed Civil Hospital डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अबोधचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयातील अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन अन् डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा बळी

बीड : रूग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारलेल्या तरूणाला अपघात विभागात दाखल केले. तात्काळ सर्जनला कॉल दिला. परंतु,  ते आलेच नाहीत. अखेर ८ तासानंतर जखमी तरूणाचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अबोध भोसले (वय ३१ रा.सावरगाव ता.भूम जि.उस्मानाबाद) असे मयताचे नाव आहे. अबोधचे शिक्षण डीएड झालेले आहे. तो सध्याा पुण्याजवळील एका गावात रहात होता. काही दिवसांपूर्वीच त्याने तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात सुदैवाने तो बचावला आणि त्याला एका खाजगी रूग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू होते. परंतु परिस्थिती गरीब असल्याने त्याला बीडच्या जिल्हा रूग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल केले. त्याच्यावर स्थलांतरीत रूग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अबोधने वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. यात त्याला पाठीला थोडी जखम झाली होती, परंतु आतमध्ये जास्त जखम असल्याचे सांगण्यात आले. त्याला तात्काळ अपघात विभागात दाखल केले. 

येथे वैद्यकीय अधिकारी डॉ.शंकर काशीद यांनी त्याच्यावर तात्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ यांना कॉल देण्यात आला. मानसोपचारतज्ज्ञांनी येऊन तपासणी करीत औषधी दिले. परंतु अबोधला शरिरात आतून जखम असल्याने सर्जनची गरज होती. सकाळी ९ वाजेच्या सुमारास अबोधने शेवटचा श्वास घेतला. अबोध तडफडून मेला परंतु सर्जन रूग्णालयात फिरकलेच नसल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अबोधचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत पोलीस चौकीत अबोधचा भाऊ आमोल यांनी जबाब दिला आहे.

फिजिशियनही फिरकेनातजिल्हा रूग्णालयात कोवीड वॉर्डमध्ये चार तर स्थलांतरीत जिल्हा रूग्णालयात ३ असे सात फिजिशियन आहेत. असे असतानाही स्थलांतरीत रूग्णालयात कॉलवर या फिजिशियनला न ठेवता इतर डॉक्टरांच्या ड्यूट्या लावल्या जातात. हे फिजिशियन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने इकडे कधीच फिरकत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एसीएस डॉ.राठोड यांनी इतर डॉक्टरांना ड्यूटी लावल्याचेही मान्य केले.

सीएस, एसीएस विरोधात सामान्यांमध्ये रोषमागील काही दिवसांपासून जिल्हा रूग्णालयातील कारभार ढेपाळला आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुर्यकांत गित्ते, एसीएस डॉ.सुखदेव राठोड हे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. कसलेही नियोजन नसल्याने सामान्य रूग्णांचे हाल होत आहेत. शिवाय अबोधसारख्यांचा रोज जीव जात आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांविरोधात सामान्यांमध्ये तीव्र रोष आहे.

अपघात विभागात डीएमओने तपासले होतेहा तरूण दोन दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्याला मानसोपचार तज्ज्ञ, फिजिशियनने उपचार केले होते. रविवारी रात्री हा तरुण इमारतीवरून पडला. तो गंभीर जखमी होता. अपघात विभागात डीएमओने तपासले होते. सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. नातेवाईकांच्या आरोपाचे काय तर बघु.- डॉ.सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक बीड 

टॅग्स :Deathमृत्यूBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडBeedबीड