शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

पुरुषोत्तमपुरीत भाविकांची नौका उलटली; सुदैवाने जीवित हानी टळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 16:57 IST

अधिकमासनिमित्त देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर असलेल्या पुरुषोत्तपुरीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नौका सोमवारी सकाळी १० वाजता गोदावरी नदीत उलटली.

माजलगाव : अधिकमासनिमित्त देशातील एकमेव भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर असलेल्या पुरुषोत्तपुरीत भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची नौका सोमवारी सकाळी १० वाजता गोदावरी नदीत उलटली. प्रसंगावधान राखून बंदोबस्तावर असलेल्या पोलीस कर्मचारी, ग्रामस्थांनी वेळीच नदीत उड्या घेऊन भाविकांचे प्राण वाचविल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. विनापरवाना चालणाऱ्या नौका बंद करण्याची मागणी ग्रामास्थातून होत आहे.दर तीन वर्षानंतर येणाऱ्या अधिकमासात भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे मोठे महत्व आहे. देशात एकमेव मंदिर असलेल्या पुरुषोत्तमपुरीत सध्या भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. जालना, परभणी जिल्ह्यातील अनेक भाविक नौका, कलही, बोटीतून गोदावारीनदी पार करून पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येतात. सोमवारी दि. ११ सकाळी १० वाजता परतूर तालुक्यातील रेवलगाव, रामनगर येथील २८ भाविक एका बोटीतून दर्शनाला येत होते. बोट नदीपात्रात असताना अचानक उलटल्याने सर्व भाविक नदीपात्रातील पाण्यात पडले. काठावर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस कर्मचारी, ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तत्काळ पाण्यात उद्या घेऊन काही महिला भाविकांचे प्राण वाचविल्याने मोठी जीवितहाणी टळली. सर्व भाविकांना पाण्याच्या बाहेर काढून तत्काळ पुरुषोत्तमपुरी येथील खाजगी 

...बोट उलटून जखमी झालेले भाविक मंदाकिनी सुरवसे, शालन सुरवसे, गंगाराम लहाने, सविता घायाळ, अश्विनी घायाळ, चंद्रकला घायाळ, प्रयागबाई चव्हाण, इंदुबाई घायाळ, अशामती लहाने, राजाभाऊ घायाळ, बाळासाहेब भुंबर, सावित्रा घायाळ, इंदुबाई घायाळ, विजयमाला भुंबर, गीता कांबळे, मुक्ता लहाने, उमा घायाळ, गंगुबाई सुरवसे, अरुणा घायाळ, सुदामती साकळकर, मीरा मोगल, वच्छलाबाई शिंदे, संगीता थेटे, अनिता पवार, प्रियंका पवार, अभिषेक थेटे, गणेश थेटे, प्रांजल पवार (सर्व राहणार रेवलगाव, रामनगर तालुका परतूर जिल्हा जालना.... यांनी वाचविले भाविकांचे प्राण पोलिस कर्मचारी पोलीस उपनिरीक्षक डी.बी. मोरे, कर्मचारी एम.डी. वडमारे, ग्रामस्थ प्रकाश आबासाहेब ढोके, सचिन गोविंद लोखंडे,विकास शेषेराव लोखंडे, बालाजी लोखंडे....विनापरवाना चालतात बोटी पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरी नदीपात्रात जवळपास वीस ते पंचवीस बोटी, कलही, नौका चालतात. दर्शनासाठी आलेले काही भाविक आनंद घेण्यासाठी नौका विहार करतात तर जालना, परभणी जिल्ह्यातील येणाऱ्या भाविकांना बोटीतून दर्शनासाठी यावे लागते. गोदावरी नदीपात्रात चालणाऱ्या सर्व बोटी या विनापरवाना असून त्या तत्काळ बंद करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

टॅग्स :Beedबीड