शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

कृषी कार्यालयातील अपु-या कर्मचारी संख्यने माजलगावात शेतक-यांची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 5:31 PM

माजलगाव तालुका कृषी कार्यालयात मागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या केवळ अर्ध्या कर्मचा-यांवरच कार्यालयाचा कारभार चालु असल्याने शेतक-यांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत.

ठळक मुद्देमागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त मंजुर पदे 54 असुन देखील केवळ 33 कर्मचा-यांवर कार्यालयाचा कारभार

माजलगांव ( बीड ), दि. १३ : तालुका कृषी कार्यालयात मागील दोन वर्षांपासून अनेक कर्मचा-यांची पदे रिक्त आहेत. यामुळे सध्या केवळ अर्ध्या कर्मचा-यांवरच कार्यालयाचा कारभार चालु असल्याने शेतक-यांची अनेक कामे प्रलंबित राहत आहेत. तसेच यामुळे आहे त्या कर्मचा-यांवर देखील अतिरिक्त कामाचा ताण मोठया प्रमाणावर वाढला आहे. 

माजलगांव तालुका बीड जिल्हयातील सधन शेतक-यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. त्यामुळे येथील तालुका कृषी कार्यालयात मोठया प्रमाणावर शेतकरी विविध कामासाठी येतात. यासोबतच शेतक-यांना कृषी कर्मच्या-यांची फिल्डवरील अनेक कामांसाठी मदतची आवश्यकता असते. यात शेतक-यांना पिकांच्या संदर्भात योग्य माहिती देणे, नवनविन शेती औजारांबाबत शेतक-यांमध्ये जागरुकता निर्माण करणे, मातीच्या गुणवत्तेनुसार कोणती पिके घ्यावीत या बाबत माहिती देणे तसेच इतर विविध प्रकारे शेतक-यांना माहिती पुरविणे त्यांच्या अडचणी दुर करणे तसेच शासनाच्या विविध योजना शेतक-यांपर्यंत पोंच करणे अशी विविध प्रकारच्या कामांचा समावेश आहे. मात्र, या कार्यालयात मागील दोन वर्षांपासुन कर्मचा-यांची संख्या अपुरी आहे. मंजुर पदे 54 असुन देखील केवळ 33 कर्मचा-यांवर कार्यालयाचा कारभार चालवावा लागतो. 

अपु-या कर्मच्या-यांवरच मदार  यातच वरिष्ठ अधिकारी कार्यालयात नसतांना यातील अनेक कर्मचारी अनुपस्थित राहतात. त्यामुळे शेतक-यांना आपली कामे करुन घेतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या कार्यालयात तालुका कृषि अधिकारी 1 पद रिक्त आहे, मंडळ अधिका-यांच्या तीन जागा असुन तिनही जागा रिक्त आहेत, पर्यवेक्षकांच्या सात जागांपैकी तीन जागा रिक्त आहेत, कृषि सहाययकाच्या 37 जागांपैकी 22 जागा रिक्त आहेत , कारकुनाच्या 2 जागांपैकी दोन्ही जागा रिक्त आहेत तर शिपायाच्या 5 जागांपैकी 3 जागा रिक्त आहेत. 

माजलगाव कृषि कार्यालयांतर्गत सद्या कार्यरत असलेल्या कर्मचा-यांपैकी ब-याच कर्मचा-यांकडे इतर ठिकाणचे देखील चार्ज आहेत त्यांना ज्या ठिकाणचे चार्ज आहेत तेथे देखील वेळ द्यावा लागतो त्यामुळे माजलगांवचे कार्यालय हे अत्यल्प कर्मचा-यांवर सद्या चालु असल्यामुळे कृषि कार्यालयाच्या कामकाजावर मोठा परिणाम होतांना दिसत आहे. या ठिकाणी कर्मचा-यांची रिक्तपदे तात्काळ भरण्यात येवून कारभार सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातुन होतांना दिसत आहे. 

आहे त्या कर्माचा-यांवर काम सुरु आहे कार्यालयाकडुन दर महिन्याला वरिष्ठ कार्यालयाकडे कर्मचा-यांबाबत अहवाल पाठविण्यात येतो. सध्या आम्ही आहे तेवढया कर्मचा-यांवरच कार्यालयाचे संपुर्ण काम करुन घेत आहोत.- एस.एम. काळेल, प्रभारी तालुका कृषि अधिकारी