जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्या हस्ते रविवारी या कामांना सुरुवात करण्यात आली. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत भोपला ते आथर्डी रस्ता सुधारणा २५ लाख, भोपला ते हादगाव शिवार रस्ता सुधारणा २५ लाख, तसेच पशुवैद्यकीय दवाखाना नवीन इमारतीसाठी ३० लाख अशा एकूण ८७ लाख खर्चाचे बांधकाम करण्यात येणार आहे. यावेळी माजी जि. प. सदस्य सुरेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस डाॅक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. नरेंद्र काळे, ॲड. बी. डी. कोल्हे, उस्मानाबादचे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, कळंबचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, येवता सरपंच विलास जोगदंड, सरपंच पती विजयसिंह जाधव, बाळासाहेब जाधव, काळेगावघाटचे सरपंच संग्राम आगे, तसेच पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
===Photopath===
220321\22bed_10_22032021_14.jpg