शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

coronavirus : अंबाजोगाईतील प्रयोगशाळेच्या कामाची गती संथ; मंजुरी मिळून महिन्यानंतरही कार्यान्वित नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 18:54 IST

अंबाजोगाईची प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. 

ठळक मुद्देलातूरच्या प्रयोगशाळेत स्वॅबची संख्या वाढल्याने अहवालाला उशिर

- सोमनाथ खताळ

बीड : कोरोना संशयितांचे स्वॅब घेतल्यानंतर ते जिल्ह्यातच तपासता यावेत, यासाठी अंबाजोगाई येथे प्रयोगशाळा मंजूर झाली. परंतु महिना उलटूनही अद्याप ही प्रयोगशाळा तयार झालेली नाही. त्याचे काम संथ गतीने सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. लातूरच्या प्रयोगशाळेत स्वॅबची संख्या वाढल्याने अहवाल येण्यास उशिर होत आहे. त्यामुळे अंबाजोगाईची प्रयोगशाळा लवकर कार्यान्वित करण्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष देण्याची गरज आहे. 

शासनाने राज्यात सहा ठिकाणी कोरोना विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळांना मंजूरी दिली. यात बीडमधील अंबाजोगाईचा देखील समावेश होता. कोरोनाची वाढती परिस्थिती लक्षात घेता साधारण महिनाभरात प्रयोगशाळा कार्यान्वित होईल, असे अश्वासन देण्यात आले होते. परंतु महिना उलटल्यानंतरही या प्रयोगशाळेचे काम अर्धेच झालेले आहे. यावरून हे काम संथगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे यासाठी नियोजनमधून अडीच कोटींचा निधीही देण्यात आलेला आहे.

दरम्यान, सध्या बीड जिल्ह्यातील सर्व स्वॅब लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत पाठविले जात आहेत. याच प्रयोगाळेत लातूरसह उस्मानाबाद जिल्ह्यातूनही स्वॅब तपासणीस येतात. सुरूवातील रुग्ण कमी असल्याने ताण कमी होता. परंतु आता तीनही जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यांच्या संपर्कातील आणि बाहेरून आलेल्या लोकांचे स्वॅब घेतले जात आहेत. ही संख्या दररोज ३०० पेक्षा जास्त होत आहे. त्यामुळे प्रयोगशाळेवर ताण येत असून अहवाल प्राप्त होण्यास उशिर होत आहे. इकडे अहवालांची प्रतिक्षा करून नागरिक चिंतेत आहेत. त्यामुळे ही प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनीही स्वाराती रुग्णालयास भेट दिली होती. 

२४ तासांत १५० स्वॅब तपासण्याची क्षमतालातूरच्या प्रयोगशाळेत २४ तासांत १५० स्वॅब तपासण्याची क्षमता आहे. परंतु संख्या वाढल्याने येथील अधिकारी, कर्मचारी जादा वेळ घेत आलेला प्रत्येक स्वॅब तपासत आहेत. मंगळवारी १८२ स्वॅबची तपासणी केली होती. त्यामुळे अहवाल येण्यास मध्यरात्र झाली होती. बुधवारी तर बीडमधूनच ११४ स्वॅब गेले होते. लातूर आणि उस्मानाबादचाही आकडा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या स्वॅब तपासण्यास वेळ लागत आहे. 

नमीता मुंदडांचे वैद्यकीय मंत्र्यांना पत्रस्वॅबची संख्या वाढल्याने लातूरच्या प्रयोगशाळेवर ताण येत आहे. अहवाल येण्यास उशिर होत आहे. त्यामुळे अंबाजोगाई येथील प्रयोगशाळा लवकरात लवकर सुरू करावी. त्यामुळे वेळेत अहवाल मिळून रुग्णांवर उपचार होऊ शकतील, असे पत्र केजच्या आ.नमिता मुंदडा यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना दिले आहे. 

जिल्हाधिकारी, अधिष्ठातांचा प्रतिसाद नाहीया प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. परंतु त्यांनी तो घेतला नाही. तर स्वारातीचे अधिष्ठाता डॉ.सुधिर देशमुख यांनी भ्रमणध्वणी कट केला. त्या दोघांकडूनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांची बाजू समजली नाही. 

प्रयोगशाळेत २४ तासांत १५० स्वॅब तपासण्याची क्षमता आहे. आलेले स्वॅब दररोज तपासले जातात. - डॉ.वियकुमार चिंचालीकर, प्रमुख, कोरोना विषाणु संशोधन व निदान प्रयोगशाळा, लातूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड