शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

निर्भिडपणे काम करा, अफवांवर विश्वास ठेवू नका -क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:03 IST

विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. लोकशाहीच्या पहिल्या कसोटीत यश मिळवण्यासाठी आता योगदान द्या. आपली खरी ताकत आत्ताच कामाला लावा तरच पुढचे भवितव्य ठरणार आहे. निर्भिडपणे काम करा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रतिपादन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देआवाहन : विविध संस्थांच्या वार्षिक सभेत प्रतिपादन, गुणवंतांचा सत्कार; मान्यवरांची होती कार्यक्रमाला उपस्थिती

बीड : विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. लोकशाहीच्या पहिल्या कसोटीत यश मिळवण्यासाठी आता योगदान द्या. आपली खरी ताकत आत्ताच कामाला लावा तरच पुढचे भवितव्य ठरणार आहे. निर्भिडपणे काम करा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे प्रतिपादन राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.मंगळवारी शहरातील माँ वैष्णो पॅलेसमध्ये आदर्श शिक्षण संस्था पतपेढी, नवगण, विनायक कर्मचारी पतसंस्था व गजानन नागरी सहकारी बँक, खरेदी विक्र ी संघ सहकारी संस्था, गजानन सहकारी सुतगिरणी या संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी दिनकर कदम, विलास बडगे, अरूण डाके, शेषेराव फावडे, रविंद्र कदम, राजेश क्षीरसागर, गणपत डोईफोडे, मावराव मोराळे, अ‍ॅड.राजेंद्र राऊत आदी उपस्थित होते.यावेळी क्षीरसागर म्हणाले की, येणारा काळ स्पर्धेचा आहे, आरक्षणाचे समर्थन करत असलो तरी पुढची पिढी गुणात्मक दृष्टीने पुढे जाणे गरजेचे आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी बीडचे लोक स्थायिक झाले आहेत. जिथे संधी मिळेल तिथे आपली माणसे गेली आहेत. विविध मोठ्या स्पर्धा परिक्षांमध्ये बीडच्या तरूणाईचा सहभाग वाढत आहे. शिक्षण क्षेत्रात होणारा बदल नवीन पिढीने स्विकारावा. समाजात विविध घटक आहेत. डॉक्टर, इंजिनिअर वगळता अन्य क्षेत्रातही तरुणांनी जायला हवे.आपल्या संस्थेतून लाखभर मुले शिक्षण घेऊन मोठ मोठ्या पदांवर आहेत. सर्वांच्या सहकार्याने मला देखील मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. विकासासाठी आपण प्रामाणिकपणे काम करतो म्हणूनच कामे होऊ लागली आहेत. बीड जिल्ह्याची परिस्थिती बिकट आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न चालू आहेत. बीड-परळी रेल्वे मार्गाचे काम जोमाने चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आदर्श शिक्षण संस्था, नवगण विनायक कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या गुणवंत पाल्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.याप्रसंगी सखाराम मस्के, नानासाहेब काकडे, डॉ.राजू मचाले, एम.ए.राऊत, थिटे ए.एस., डॉ.कंधारे व्ही.एस., विश्वनाथ काळे, स्वामी एम.एस, मन्मथआप्पा हेरकर, डी.बी.आघाव, राजेंद्र मुनोत, अ‍ॅड.राजेश तांगडे, दत्तात्रय डोईफोडे, बाबासाहेब हिंदोळे, बालाप्रसाद जाजू, विश्वंभर सावंत, कोंडीराम निकम, कल्याण खांडे, बाबूराव राठोड, शेख नसीर, रंजीत आखाडे, कल्पना शेळके, किष्किंधा शिंदे, एस. बी. घोडके, आर. एम. कुºहे, व्ही. बी. बचुटेसह सर्व संस्थेचे अधिकारी, पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीराम जाधव यांनी केले. श्रीकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर