शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वेतनासाठी महिला कामगार आक्रमक; बीड नगरपालिकेत ५० कर्मचाऱ्यांना कोंडले

By सोमनाथ खताळ | Updated: May 25, 2023 15:36 IST

वेतनाची मागणी करत बीड पालिका मुख्याधिकाऱ्यांच्या नावाने ठोकल्या बोंबा

बीड : येथील नगरपालिकेतील रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांचे तीन महिन्यांपासून वेतन थकले आहे. याच वेतनासाठी महिन्यापूर्वी पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले होते. त्यानंतरही आजपर्यंत वेतन न मिळाल्याने गुरुवारी दुपारी महिला कामगार आक्रमक झाल्या. तळपत्या उन्हात आंदोलन करत त्यांनी पालिकेच्या गेटला पुन्हा एकदा कुलूप लावून ५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना कोंडले. तसेच मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्यामुळेच वेतन मिळत नसल्याचा आरोप करत बोंबा मारल्या.

बीड शहरातील स्वच्छतेची जबाबदारी खासगी कंत्राटदाराला देण्यात आलेली आहे. परंतु त्यांना पालिका वेळेवर बिल देत नाही, त्यामुळे आमचे पगार वेळेवर होत नाहीत. याच मुद्द्यावर ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही झाली होती. तेव्हा मुख्याधिकाऱ्यांनी महिनाभरात प्रकरण निकाली काढू, असे अश्वासन दिले होते. परंतु सीईओंकडून आश्वासन पूर्ण न झाल्याने गुरुवारी महिला कामगार आक्रमक झाल्या. दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांनी अचानक पालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. त्यामुळे पालिकेचे जवळपास ५० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यालयातच अडकले. शिवाय विविध कामांसाठी पालिकेत गेलेले सामान्य नागरिकही अडकून पडले होते. या प्रकारानंतर पाेलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली, परंतु आतील लोक बाहेर काढण्यात त्यांनाही यश आले नाही. महिलांनी जोपर्यंत वेतन होत नाही, तोपर्यंत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा घेतला होता.

सीईओ अंधारेंविरोधात संतापबीड पालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्याविरोधातच कामगारांचा जास्त रोष होता. त्या कार्यालयात कधीच बसत नाहीत. त्यांच्यामुळेच आमचे वेतन रखडले आहे. शिवाय सध्याच्या नांदेड येथील कंत्राटदाराला बाजूला करत जुन्याच कंत्राटदाराला स्वच्छतेचे कंत्राट देण्याचा घाट त्या घालत आहेत. यासाठी त्यांनी लाखो रुपये घेतल्याचा आरोपही या कर्मचाऱ्यांनी केला. तसेच सीईओ अंधारे यांच्या नावानेच या महिलांंनी बोंबा मारून आपला संताप व्यक्त केला. याबाबत अंधारे यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वणी नॉट रिचेबल होता.

टॅग्स :BeedबीडagitationआंदोलनMuncipal Corporationनगर पालिका