शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वेश्याव्यवसायाच्या दलदलीत अडकल्या महिला; बीडच्या कुंटणखान्यातून परराज्यातील पीडितांची सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2023 13:45 IST

बीड शहरातील मध्यवर्ती असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या समोरील भागात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती माजलगावचे सहायक अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी लगेच आपल्या पथकामार्फत सापळा लावला.

- सोमनाथ खताळबीड :  शहरात ५०० रुपयांत देहविक्री केली जात असल्याचे समाेर आले आहे. बीड शहरातील कुंटणखान्यावरील वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या व्यवसायात बीडच नव्हे तर परजिल्हे आणि राज्यातील मुली, महिलांनाही ओढले जात असल्याचे समोर आले आहे. महिलांची परिस्थिती पाहून त्यांना वेश्याव्यवयासाच्या घाणीत ढकलले जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

बीड शहरातील मध्यवर्ती असलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या समोरील भागात कुंटणखाना सुरू असल्याची माहिती माजलगावचे सहायक अधीक्षक डॉ. धीरजकुमार यांना मिळाली होती. त्यांनी लगेच आपल्या पथकामार्फत सापळा लावला. आपलाच कर्मचारी डमी ग्राहक म्हणून पाठवला आणि रविवारी रात्री या व्यवसायाचा पर्दाफाश केला. यात दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून सहा महिलांची सुटका करण्यात आली. दरम्यान, या महिला केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारील जिल्हे आणि परराज्यातीलही असल्याचे समोर आले आहे. या सर्व महिलांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता सुधारगृहात पाठविले आहे. तर दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली आहे.

दरम्यान, याच भागात नेहमीच पोलिसांकडून छापे मारले जातात. यापूर्वीही येथे कारवाया झालेल्या आहेत. यातही अनेक महिलांची सुटका केलेली आहे. परंतु स्थानिक पोलिसांच्या 'अर्थ'पूर्ण दुर्लक्षामुळे हा व्यवसाय वारंवार थाटला जात आहे. हा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे अशा लोकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

परराज्यातील पीडितांचे बीडमध्येच मुक्कामपरराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून बीडमध्ये आणण्यात आलेले आहे. तसेच त्यांना राहण्यासाठी खोलीही करून देण्यात आलेली होती. सुटका केलेल्या सहा पीडितांमध्ये दोन अहमदनगर, १ परभणी, १ बीड आणि दोन पश्चीम बंगाल राज्यातील आहेत. तसेच येणारे ग्राहकही परजिल्ह्यातून बीडमध्ये येत असल्याचे सांगण्यात आले. याच कारवाईत सापडलेला एक आरोपी हा मानवत (जि.परभणी) येथील आहे.

पत्र्याच्या खोलीत चालायचा व्यवसायहा कुंटणखाना पत्र्याच्या खोलीत सुरू होता. प्रत्येक खोलीत गादी आणि इतर साहित्य होते. ग्राहकांनी थेट येथे जाऊन महिला पाहून पैशांची बोली लावली जात असे. 

पिडीत सुधारगृहात रवानाआम्हीही ही कारवाई करण्यासाठी लोकेशन घेत होतो. परंतु पथकाला त्याची माहिती मिळाली आणि कारवाई झाली. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी झाली आहे. तर यातील पीडित सहाही महिलांना सुधारगृहात पाठविले आहे. त्या वेगवेगळ्या राज्यातील, जिल्ह्यातील असल्याचे सांगत आहेत.- केतन राठोड, पोलिस निरीक्षक शिवाजीनगर

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड