शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये पोटात बाळ घेऊन महिला ऊसतोडीच्या फडात; न्यायालयाच्या आदेशाचा ‘पाचोरा’!

By सोमनाथ खताळ | Updated: February 19, 2026 18:31 IST

बीडमधील वास्तव : पाच महिन्यांचा कालावधी झालेल्या १० महिला फडात

बीड : उच्च न्यायालयाने ऊसतोड मजूर महिलांच्या आरोग्याबाबत दिलेल्या निकालाचे आणि निर्देशांचे जिल्ह्यात सर्रास उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ‘पाच महिन्यांवरील गर्भवतींना कामावर घेऊ नये’ असे स्पष्ट आदेश असतानाही, बीड जिल्ह्यात चक्क १० गर्भवती महिला फडावर कष्टाची कामे करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कामगार विभाग आणि साखर आयुक्तांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

ऊसतोड मजुरांच्या गंभीर समस्यांची दखल घेत न्यायालयाने २०२३ मध्ये ‘सुमोटो’ याचिका दाखल केली होती. मार्च २०२५ मध्ये दिलेल्या निर्देशानुसार, पाच महिन्यांपेक्षा जास्त काळ गर्भवती असलेल्या महिलांना ऊसतोडीच्या कामावर लावणे बेकायदेशीर आहे. असे आढळल्यास संबंधित मुकादमावर कारवाई करून साखर कारखान्याचा परवाना रद्द किंवा निलंबनाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, २०२५-२६ च्या चालू हंगामात या नियमांना केराची टोपली दाखवली जात आहे. एवढेच नव्हे तर इतरही निर्देशांकडे संबंधित कार्यालयाकडून दुर्लक्ष केेले जात असल्याचे सांगण्यात आले.

गर्भवती असतानाही कष्टआरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या तीन महिन्यांत ५४ ऊसतोड मजूर गर्भवती महिलांची नोंदणी झाली. धक्कादायक म्हणजे, यातील १० महिला नोंदणी वेळीच पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. न्यायालयाच्या आदेशानुसार या महिलांना सेवेतून प्रसूती रजा मिळणे अपेक्षित असताना, त्या जीवघेण्या कष्टाचे काम करत आहेत.

कोण काय म्हणतंय....आरोग्य विभागाकडे विचारणा केल्यावर आपल्याकडे नोंदणी केली जाते. तसेच आशाताई, डॉक्टरांमार्फत गर्भवतींनी काम करू नये, असे सुमपदेशन केले जात असल्याचा दावा केला. तर साखर कार्यालयाकडून आरोग्य विभागाने छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाला अहवाल द्यावा. त्यांनी तो आम्हाला पाठविल्यावर आम्ही त्याची खात्री करतो, असे सांगण्यात आले. यावरून हे दोन्ही विभाग उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.

२०१९ नंतर ५७६ गर्भपिशवी शस्त्रक्रियाजिल्ह्यात एकूण ८४३ गर्भपिशवी शस्त्रक्रियांची नोंद असून, त्यातील २६७ शस्त्रक्रिया २०१९ नंतर, तर ५७६ शस्त्रक्रिया २०१९ पूर्वी झाल्या आहेत. या संदर्भात अधिक सखोल माहिती गोळा केली जात असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील मजुरांचे वास्तवबीड जिल्ह्यात ९ कारखाने व एका गुऱ्हाळावर ५,०४२ मजूर (२,२२३ महिला) कार्यरत आहेत. एप्रिल ते जानेवारी दरम्यान जिल्ह्यात ४०,४७१ गर्भवतींची नोंद झाली. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांत फडावर ५४ गर्भवती महिलांची नोंद असून, त्यातील १० महिला ५ महिने पूर्ण झालेल्या आहेत, जे चिंतेचे वास्तव अधोरेखित करते. राज्यात हा आकडा आणखी मोठा असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील मजुरांची स्थितीजिल्ह्यातील एकूण ऊसतोड मजूर - १७५०९३पुरूष - ९६६१७महिला - ७८४७६स्थलांतरीत मजूर - १७०५१सध्या बीड जिल्ह्यांतर्गत कार्यरत मजूर - ५,०४२महिला मजूर : २,२२३पुरूष मजूर : २८१९

English
हिंदी सारांश
Web Title : Pregnant women forced to cut sugarcane in Beed, court orders ignored.

Web Summary : Beed authorities flout court orders, forcing pregnant women into sugarcane fields. Ten pregnant women, some over five months, are working despite a ban. This raises concerns about labor department and sugar commissioner oversight. Many hysterectomies highlight the health risks faced by women laborers.
टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेBeedबीड