शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

वादळी वारे, पावसाने गंगामसल्यात हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2019 11:50 PM

शुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले. तर माजलगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित झालेला आहे.

ठळक मुद्देमाजलगाव तालुक्यात वीज पडून ३ जणांचा मृत्यू । परिसरातील अनेक गावांमध्ये देखील मोठे नुकसान

माजलगाव : शुक्रवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत पावसाने धुमाकूळ घातल्याने मोठे नुकसान झाले. तर माजलगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून विजेच्या तारांवर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात तारा तुटल्या त्यामुळे तालुक्याचा वीजपुरवठा २४ तासांपासून खंडित झालेला आहे.तालुक्यातील गंगामसला येथे वादळी वाऱ्यामुळे अवघ्या दहा मिनिटात गावातील सुमारे सत्तर टक्के घरावरील पत्रे उडून गेले. अनेक घरांच्या भिंतीनां तडे गेले. काही घरांचे माळवद खचले. लोखंडी पोल जमीनदोस्त झाले. त्यामुळे संपूर्ण गावभर विजेच्या तारा आडव्या उभ्या पडलेल्या होत्या. गावातील ५० टक्के झाडांपैकी काही तुटून तर काही उन्मळून पडली. यामुळे राष्ट्रीय महामार्गापासून गावात जाणारा रस्ता पूर्णत: बंद झाला. तो शनिवारी दुपारपर्यंतच बंदच होता. घटना घडल्यानंतर रात्री येथील शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख सतीश सोळंके हे काही सवंगड्यांसह गावातील लोकांना धीर देत होते. तसेच प्रशासनाला देखील त्यांनी याची वेळीच कल्पना दिली होती अनेक जणांना औषधोपचारासाठी मदत केली.पलंगामुळे वाचला चौघांचा जीवतुफान वाऱ्यांमुळे घराच्या वरील तसेच बाजूने लावलेले पूर्ण पत्रे उडून गेले. त्यात गावातील उडालेले पत्रे अंगावर कोसळत असल्याने गणेश गाडे व शिवकन्या गाडे यांनी जीव वाचविण्यासाठी घरातील पलंगाखाली अस्मिता व चैतन्य या मुलांसह आश्रय घेतला. पाऊस थांबल्यानंतर शेजाºया पाजाºयांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना पलंगाखालून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.वादळी वा-यात अनेक जण जखमीतुफान पावसामुळे तसेच वाºयामुळे उडालेल्या पत्रे व दगडांमुळे अनेकजण जखमी झाले. अशोक पांढरे याच्या पायावर दगड पडल्याने त्याच्या पायाची नस तुटली. त्यांना बीड येथे उपचारासाठी पाठविले आहे. अर्चना कदम नामक महिला मानेला पत्रा लागल्याने गंभीर जखमी झाली. तसेच भालचंद्र सोळंके यांच्या डोक्याला पत्र्याचा मार लागला आहे. गणपत लांडगे यांच्या घरावर झाड पडल्याने ते जखमी झाले. तसेच रमेश पंडित, मुक्तीराम तावडे, महादेव पंडित, बाळासाहेब कदम, प्रकाश कदम, गंगुबाई लगड, तुळसाबाई धोंडे, एकनाथ धरपडे, शकील पठाण, तुकाराम सोळंके, वैजनाथ कदम आदी वादळी वाºयाच्या फटक्याने जखमी झाले आहेत. तसेच यमुनाबाई व त्यांचे पती हरिभाऊ सोनटक्के या वृद्ध जोडप्याचे संपूर्ण घर पडले.वादळी पावसाने घेतले तिघांचे बळीवादळी पावसामुळे तालुक्यातील नागडगाव येथील अंजली खामकर वय २५ हिचा शेतातून परत येत असताना वीज अंगावर पडून मृत्यू झाला. महातपुरी येथील पांडुरंग कचरूबा जामकर यांचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. तसेच माजलगाव शहरातील फुलेनगर भागात राहणाºया आश्रफबी गणी सय्यद या ६० वर्षीय महिलेचा अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस