शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भाजपात वाढले इच्छुक; अनेक ठिकाणी पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 00:09 IST

बीड जिल्ह्यात भाजपात इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे उमेदवारी जाहीर करताना निश्चितच पेच निर्माण होणार आहे.

सतीश जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्ह्यात भाजपात इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे उमेदवारी जाहीर करताना निश्चितच पेच निर्माण होणार आहे. विशेषत: आष्टीमध्ये आ.सुरेश धसांचे पूत्र जयदत्त धसांनी संपर्क वाढविल्यामुळे भाजपाच्या मतदारांत संभ्रम निर्माण झाला असून विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. इकडे माजलगावमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार आर.टी. देशमुख असतानाही रमेश आडसकरांनी संपर्क वाढविल्यामुळे उमेदवारीबाबत अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे.बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ असून २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने परळी, माजलगाव, आष्टी, गेवराई आणि केज तर राष्टÑवादी काँग्रेसने बीडची जागा जिंकली होती. बीडचे जयदत्त क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. युती झाल्यास ही जागा शिवसेनेला सुटते की शिवसंग्रामला सुटते, याबद्दल उत्सुकता आहे. शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर प्रचारास लागले आहेत. शिवसंग्रामकडून आ.विनायक मेटे तर राष्टÑवादीकडून संदीप क्षीरसागर मैदानात उतरतील. वंचित आणि एमआयएमचा उमेदवार अजून निश्चित नाही.गेवराईत भाजपाकडून आ. लक्ष्मण पवार, राष्टÑवादीकडून विजयसिंह पंडित यांची उमेदवारी निश्चित आहे. युती झाल्यास शिवसेनेच्या बदामराव पंडित यांची भूमिका काय असेल, हे ही उत्सुकतेचे आहे. वंचितकडून इंजि. विष्णू देवकते यांची शक्यता आहे.माजलगावमध्ये विद्यमान आमदार आर. टी. देशमुख यांच्यासह रमेश आडसकर, मोहन जगताप, ओमप्रकाश शेट्ये हे इच्छूक आहेत. राष्टÑवादीने प्रकाश सोळंके यांची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. वंचित आणि एमआयएमचा उमेदवारही ठरला नाही.जिल्ह्यातील सर्वात चुरस परळीत पहावयास मिळणार आहे. भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्टÑवादीचे धनंजय मुंडे या बहीण-भावात ही लढत असेल. आतापासूृनच या मतदारसंघात वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.आष्टीमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे असताना आ.सुरेश धस यांचे पूत्र जयदत्त धस हे मतदारसंघात फिरत आहेत. साहेबराव दरेकर हे देखील इच्छूक आहेत. राष्टवादी काँगे्रस, वंचित, एमआयएम यांचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत.केजमध्ये देखील संदीग्ध स्थिती आहे. नमिता मुंदडा यांना राष्टÑवादीतील गटबाजी भोवणार आहे. तसा उघड विरोधही केला आहे. तशीच अवस्था भाजपाच्या आमदार संगीता ठोंबरे यांची झाली आहे. शिवसेनेसह पक्षाच्या काही नेते मंडळीनी ठोंबरेंच्या उमेदवारीस विरोध दर्शवून पर्याय सूचविले आहेत.बहीण-भाऊ आणि काका-पुतणे लढतपरळी विधानसभा मतदार संघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या बहीणभावात लागोपाठ दुसऱ्यांदा लढत होईल. २०१४ मध्ये पंकजांनी धनंजय मुंडे यांचा जवळपास २५ हजार मतांनी पराभव केला होता. २००९ आणि २०१४ ची निवडणूक जिंकलेल्या पंकजांना हॅटट्रिक करण्याची तर धनंजय मुंडेंना झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आहे. इकडे बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्टÑवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांच्यात लढत होत आहे. २००९ आणि २०१४ ची निवडणूक जयदत्त यांनी राष्टÑवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे. आता ते शिवसेनेचे धणुष्यबाण घेऊन रिंगणात उतरतील. त्यांनाही हॅटट्रिकची संधी आहे. लढत मात्र पुतण्याशी होत आहे.केजमध्ये गटबाजी..केजमध्ये राष्टÑवादी काँग्रेसकडून नमिता मुंदडा यांची उमेदवारी शरद पवार यांनी जाहीर केली असली तरी मुंदडाच्या उमेदवारीस धनंजय मुंदडा, बजरंग सोनवणे यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. इकडे भाजपाच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांना देखील शिवसेनेसह भाजपांतर्गत एका गटाकडून तीव्र विरोध होत आहे.माजलगावमध्ये पेचमाजलगावमध्ये विद्यमान आमदार भाजपाचे आर.टी. देशमुख असले तरी उमेदवारीसाठी त्यांच्यासह रमेश आडसकर, मोहन जगताप, ओमप्रकाश शेटे हे सुद्धा इच्छूक आहेत. देशमुखांची उमेदवारी काटण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न होत आहेत. भाजपाची उमेदवारी गृहीत धरून रमेश आडसकर यांनी तर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून तयारीस जोमाने लागले आहेत. प्रचाराची त्यांची गती वाढली आहे.पालकमंत्र्यांचीकृपादृष्टीही महत्त्वाचीपालकमंत्री पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्यावर वर्चस्व आहे. त्यांची नेहमीच ‘किंगमेकर’ची भूमिका राहिली आहे. त्यांच्या कृपादृष्टीशिवाय जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात विजय मिळविणे अशक्यप्राय आहे. मनात आणले तर अशक्यप्राय विजयही सहज शक्य होतो, हे पंकजांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुरेश धसांना निवडून आणून आणि जि.प.ची सत्ता हस्तगत करताना महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. तशीच लोकसभाही जिंकून दाखवली.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकBJPभाजपाPoliticsराजकारण