केज: सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख हे आज सकाळपासून मस्साजोग येथील जलकुंभावर चढून आंदोलन करत आहेत. त्यांच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनी देखील जलकुंभावर चढून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी सहभागी असून पहिल्यांदाच आक्रमक होत तिने पोलिस, राज्य सरकारवर संताप व्यक्त केला. आजवर आम्ही खूप शांततेत आंदोलन केले पण काहीच हाती लागत नाही. काय तपास सुरू आहे, याची माहिती आम्हाला देण्यात येत नाही, काकाला काय झाले तर कोण जबाबदार? घरातील एक माणूस गेले तर प्रशासन काही करत नाहीत. वडील गेले; आम्ही सर्व गेलो तर यांचे डोळे उघडणार आहेत का? असा उद्विग्न सवाल तिने केला.
आम्हाला न्याय पाहिजे, वाल्मीक कराडवर मकोका लावा, फरार आरोपीस तत्काळ अटक करा, अशा जोरदार घोषणाबाजीने मस्साजोग येथील आंदोलन स्थळ परिसर दणाणून गेला आहे. यामुळे मस्साजोग येथे वातावरण तापले आहे. दरम्यान, मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी देशमुख यांना खाली उतरण्याची विनंती केली. तसेच जरांगे यांच्या विनंतीवरून धनंजय देशमुख हे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांच्यासोबत फोनवर बोलले. यावेळी पोलीस अधीक्षकांनी धनंजय देशमुख यांना तुम्हाला सर्व समजावून सांगतो. तुम्ही खाली या, प्रशासनाचा आणि तपास करणाऱ्या यंत्रणाचा प्रतिनिधी येथे येईल अशी माहिती त्यांनी दिली.
दोन तासांनंतर देशमुख खाली उतरलेदरम्यान, मनोज जरांगे यांना बोलताना धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक सहकार्य करत आहेत मात्र एसआयटी, सीआयडी यांच्याकडून कसल्याही प्रकारचे सहकार्य होत नाही. तपास कुठपर्यंत आला याची माहिती दिली जात नाही असा आरोप केला. दरम्यान, धनंजय देशमुख पोलिस अधीक्षक यांच्या आश्वासनानंतर तब्बल दोन तासांच्या आंदोलनानंतर जलकुंभावरून खाली उतरले आहेत.
आंदोलनस्थळी अग्निशमन दाखल ग्रामस्थांनी जलकुंभखाली ठिय्या दिला आहे. तसेच काही ग्रामस्थ पायऱ्यावर चढले. धनंजय देशमुख यांनी शिडी काढून घेतल्याने पोलीसवर जाण्यात असमर्थ ठरले त्यामुळे अग्निशामन दल गाडी येथे दाखल झाली आहे त्यांच्या शिर्डी ने धनंजय देशमुख यांना खाली आणण्यात येईल किंवा पोलीस अधीक्षक वर जाऊन त्यांच्याशी चर्चा करतील अशी चर्चा अशी शक्यता आहे.