शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

पेन्शनरांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द राहणार -भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 01:10 IST

पेन्शनरांसाठी तत्पर सेवा देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन एसबीआयचे क्षेत्रीय प्रबंधक नंदकुमार भोसले यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सेवानिवृतांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा मी माझ्या सेवाकाळात सातत्याने प्रयत्न करत आलेलो आहे. पेन्शनरांसाठी कोकणात असताना सकाळी आठ वाजेपासून बँकेमध्ये व्यवस्था केली होती. बीड येथेही अशी तत्पर सेवा देण्यासाठी आपण कटिबध्द राहणार असल्याचे प्रतिपादन एसबीआयचे क्षेत्रीय प्रबंधक नंदकुमार भोसले यांनी केले.येथील राजुरी वेस भागातील एसबीआयच्या प्रांगणात एसबीआय आणि पेन्शनर्स अ‍ॅन्ड सिनियर सिटीजन्स असोसिएशनच्या वतीने मंगळवारी पेन्शनर्स डे कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा कोषागार अधिकारी दि. र. झिरपे, एसबीआय राजुरीवेस शाखेचे मुख्य प्रबंधक महेश चौधरी, उपकोषागार अधिकारी घोळवे, माने, मराठवाडा कार्याध्यक्ष भास्करराव सरदेशमुख यांच्यासह पेन्शनर्स संघटनेचे पदाधिकारी, आयुषचे डॉ. लिमकर आदी उपस्थित होते.यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी झिरपे म्हणाले, संघटनेमुळे सेवानिवृत्तांचे जवळजवळ सर्व प्रश्न सुटलेले आहेत. एक तारखेलाच निवृत्ती वेतन देण्याचा निर्धार आम्ही केलेला आहे. सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील सर्व प्रकरणे निकाली काढले आहेत. यापुढेही कोषागार कार्यालयाकडून अडवणूक होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.मुख्य प्रबंधक महेश चौधरी म्हणाले,इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित सेवानिवृत्तांशी सुसंवाद साधण्याचा आलेला हा अनुभव माझ्या आयुष्यात महत्त्वाचा असून पेन्शनरांची सेवा करण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. पेन्शनर्स डे कार्यक्रम आयोजनाची परंपरा कायम ठेवणार असून सेवानिवृत्तांनी अडचणी असतील तर वैयिक्तक संपर्क साधावा, असेही ते म्हणाले.जिल्हा परिषद स्तरावरील वृत्तांची प्रकरणे पेन्शन अदालतच्या माध्यमातून निकाली काढली जातात असे जिल्हा परिषदेतील पेन्शन विभागाचे राहुल येनकुळे यांनी सांगितले.जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागाचे डॉ. लिमकर यांनी ज्येष्ठ नागरिकांना शासकीय रुग्णालयात आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक पेन्शनर्स अ‍ॅन्ड सिनियर सिटीझन्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. पी. ए. गोरकर यांनी केले तर सचिव डी. जे. देशपांडे यांनी आभार मानले. कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी रवींद्र केंद्रे, पी. व्ही. कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी, सुधाकर सर्वज्ञ, पद्माकरराव रत्नपारखी, प्रा. आशा पोहेकर, प्रेमचंद वैष्णव, माजी सैनिक त्र्यंबक जोशी यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले. मुख्य कार्यक्रमानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या सेवानिवृत्तांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला.या कार्यक्र मात सेवानिवृत्तांसाठीच्या नोंद दर्शिकेचे विमोचन करण्यात आले. संघटनेचे सदस्य पद्माकर रत्नपारखी आणि सचिव दुर्गादास देशपांडे यांनीही नोंद दर्शिका संपादित केली आहे.निवृत्त प्रमुख जिल्हा न्या. प्राची कुलकर्णी यांची या पुस्तिकेला प्रस्तावना असून कुटुंब निवृत्ती वेतनासह इतर बाबींच्या नोंदीसाठी ही पुस्तिका उपयोगी ठरणार असल्याचे मत अनेक सेवानिवृत्तांनी व्यक्त केले.‘होल्ड’ खात्याबाबत दक्षता घेणारपेन्शनरांच्या होल्ड खाते प्रकरणात आरबीआयचे आदेश आणि पेन्शनरांचे नियम याबाबत कायदेशीर सल्लागारांशी चर्चा करून पेन्शनरांचे खाते होल्ड होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.तसेच एटीएम हे सेवानिवृत्तांनी स्वत: वापरावे त्याचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन एसबीआयजे क्षेत्रीय महाप्रबंधकनंदकुमार भोसले म्हणाले.

टॅग्स :Senior Citizenज्येष्ठ नागरिकPensionनिवृत्ती वेतनSBIएसबीआय