शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अनैतिक संबंधातील महिलेसोबत लग्न करण्यासाठी पत्नीचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 00:30 IST

पाटोदा : स्वत:चे अनैतिक संबंध असलेल्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पतीने पत्नीचा सातत्याने छळ केला. यात त्याच्या कुटुंबियांनीही त्याला साथ दिली. अखेर विवाहितेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार केल्यानंतर पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे सदरील प्रकरण घडले.डोंगरकिन्ही येथील सारिकाचे लग्न दीड वर्षापूर्वी अमळनेर येथील नामदेव रामा ...

पाटोदा : स्वत:चे अनैतिक संबंध असलेल्या महिलेसोबत लग्न करण्यासाठी पतीने पत्नीचा सातत्याने छळ केला. यात त्याच्या कुटुंबियांनीही त्याला साथ दिली. अखेर विवाहितेने पोलिसांत धाव घेऊन तक्रार केल्यानंतर पतीसह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पाटोदा तालुक्यातील अंमळनेर येथे सदरील प्रकरण घडले.

डोंगरकिन्ही येथील सारिकाचे लग्न दीड वर्षापूर्वी अमळनेर येथील नामदेव रामा तांबारे याच्यासोबत झाले. लग्नानंतर पहिले तीन महिने सुखात गेले. त्यानंतर पती नामदेव याचे गावातीलच एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचे सारिकाच्या लक्षात आल्याने दोघांत वाद होऊ लागले. नामदेवने अनैतिक संबंध तोडण्यास सपशेल नकार दिला.

अखेर सारिकाने पतीच्या संबंधाविषयी माहेरी आणि सासरच्या लोकांना कल्पना दिली. त्यानंतर सासरच्या लोकांनी तिला तुज्या लग्नात काहीच वस्तू अथवा हुंडा दिला नाही, त्यामुळे आता जेसीबी मशीनचे हप्ते भरण्यासाठी माहेराहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी छळ सुरू केला. परंतु, माहेरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने सारिकाने पैसे घेऊन येण्यास त्यांना नकार दिला होता.

त्यानंतर सारिकाला सतत मारहाण करण्यात येऊ लागली. यावर्षी २९ मार्च रोजी नामदेव आणि ‘त्या' महिलेने सारिकाला तुज्यामुळे आम्हाला लग्न करता येत नाही म्हणून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या आणि सासू, नणंदा यांच्या मदतीने तिला बेदम मारहाण करून दहा महिन्यांच्या मुलासहित घराबाहेर काढले.

नामदेवचे लग्न त्या महिलेसोबत लावायचे असल्याने तुझी गरज नाही, असे तिला सांगण्यात आले. या घटनेनंतर सारिकाच्या आईवडिलांनी अंमळनेर येथे जाऊन बैठक घेऊन तिला नांदविण्याविषयी विनंती केली, परंतु नामदेव आणि त्याच्या कुटुंबियांनी साफ नकार दिला. यावर सारिकाने बीड येथील महिला तक्रार निवारण केंद्रात देखील अर्ज केला होता, तिथेही सासरच्या लोकांनी तिला नांदविण्यास इच्छुक नसल्याचे सांगितले.अखेर सारिकाने अंमळनेर पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीवरून पती नामदेव रामा तांबारे, सासू भागूबाई रामा तांबारे, नणंद कविता रावसाहेब बेदरे, कौसाबाई सुरेश पोकळे,सुरेश अण्णा पोकळे, रावसाहेब रामकिसन बेदरे आणि दीपा हरि पोकळे (सर्व रा. अंमळनेर) यासात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाCrimeगुन्हाMarathwadaमराठवाडा