शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आमदार प्रकाश सोळंकेंच्या बंगल्याजवळ जाळपोळ का झाली? रेकॉर्डिंग आलं समोर, 'हेच' वक्तव्य भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 16:10 IST

आज सकाळी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याजवळ आंदोलकांनी दगडफेक केली.

बीड- गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे नेत्यांना गावबंदीही केली आहे. यामुळे आता आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावर माजलगावचे राष्ट्रवादीचे आ.प्रकाश सोळंके यांची एक कथीत ऑडीओ क्लीप व्हायरल झाली होती. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मराठा समाजाच्यावतीने करण्यात आला होता. याच अनुषंगाने सोमवारी सकाळी मराठा समाजबांधव आक्रमक झाले. आ.सोळंके यांच्या घरावर मोर्चा काढून दगडफेक करण्यात आली, आता ही ऑडियो क्लिप समोर आली आहे. 

Video: राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक, गाड्याही पेटवल्या

आज सकाळी आंदोलकांनी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याजवळ उभ्या असलेल्या गाड्याही जाळल्या. काही दिवसापूर्वी सोळंके यांची एक ऑडियो क्लिप व्हायरल झाली आहे. यात आमदार प्रकाश सोळंके एका व्यक्तीसोबत आरक्षणा संदर्भात बोलत असल्याचे दिसत आहे. यात त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे समोर आले आहे. याच्याच निषेधार्थ प्रकाश सोळंकेंच्या बंगल्यावर आक्रमक आंदोलकांनी दगडफेक करण्यास सुरुवात केली. ही दगडफेक दीड तास सुरू होती. यावेळी बंगल्या जवळ लावण्यात आलेल्या गाड्याही जाळण्यात आल्या आहेत. 

व्हायरल क्लिपमध्ये संभाषण नेमकं काय आहे?

आमदार प्रकाश सोळंके यांना एका आंदोलकाने फोन केला आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यास सुरुवात केली. यावेळी त्या व्यक्तीने आरक्षणाच्या मुदतीच्या ४० दिवसांची आठवण करुन दिली. यावेळी बोलताना प्रकाश सोळंकी म्हणाले की, "कोण म्हटलं सरकार आरक्षण देत नाही. ४० दिवस झाले म्हणून काय झाले? हे आरक्षण देऊन कोर्टात परत अडकवून ठेवायचं का?  अशी आडमुठी भूमिका घेऊन चालत नाही, शासन देण्याचा प्रयत्न करत आहे. फक्त दिलेलं आरक्षण कोर्टात टीकले पाहिजे, एवढेच शासनाचे म्हणणे आहे. त्यादृष्टीने जे काही आवश्यक आहे, ते सर्व शासन करत आहे. शासनाने समिती नेमली आहे. त्या समितीचा अहवाल घेऊन शासन आरक्षण देणार आहे", असं यात म्हटले आहे, पुढे बोलताना त्या व्यक्तीने सरकारला दिलेल्या मुदतीची आठवण करुन दिली. आपण दहा दिवस बोनस दिले होते, यावर आमदार सोळंके म्हणाले ‘बोनस देणाराही महाहुशार माणूस, बोनस द्यायचे म्हणजे, कधी ग्रामपंचायतची निवडणूक लढविली नाही, पण आता हा सगळ्यात हुशार माणूस झालाय" असे आमदार सोळंके म्हणाले. हे संभाषण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

टॅग्स :Prakash Solankeप्रकाश सोळंकेBeedबीडMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील