शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पावसासाठी अख्खं गाव कोळाईच्या दरबारात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 00:13 IST

पावसाळा सुरु होऊन तब्बल दोन महिने उलटले तरी तालुक्यात दुष्काळ सुरुच आहे.

ठळक मुद्देपाऊस पाड गं आता नको अंत पाहू : दुष्काळात आधार वाटणाऱ्या ग्रामदेवतेला घराबाहेर पडून घातले साकडे

विजयकुमार गाडेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : पावसाळा सुरु होऊन तब्बल दोन महिने उलटले तरी तालुक्यात दुष्काळ सुरुच आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकर तर छावण्या बंद झाल्याने दावणीवरचे जनावरे उपाशीपोटी हंबरडा फोडत असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. येईल येईल असा अंदाज पावसाने खोटा ठरवला. हतबल झालेले ग्रामस्थ अखेर ग्राम दैवताला साकडे घालण्यासाठी व शरणागती पत्करण्यासाठी निघाले. ‘आता तूच तारण हार’ या भावनेतून अख्खं गाव शुक्रवारी घराबाहेर पडून ग्राम दैवताच्या दरबारात धरणे धरून बसला होता. ज्या ज्या वेळी अशी दुष्काळ परिस्थती निर्माण झाली त्या त्या वेळी गाव असाच बाहेर पडत असल्याचे वयस्क ग्रामस्थ बोलत होते.तालुक्यातील कोळवाडी गावात पश्चिमेला कोळाई हे ग्रामदैवत आहे. सिंदफणेच्या काठावर या लहान मंदिराच्या मागे शिळेचा मारुती व भुताचा राजा वेताळ ही दैवत उघड्यावर आहेत. जुलै संपत आलातरी पावसाने आपली वक्रदृष्टी कायम ठेवल्याने गतवर्षीच्या दुष्काळ पोटी पुन्हा दुसरा दुष्काळ जन्म घेतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नद्या वाहण्याच्या काळात टँकरचे पाणी प्यावे लागते तर डोंगरावरील मोकळा हिरवा चारा खाऊन मस्तावलेल्या जनावरांचे हुंबरण्याऐवजी दावणीवरच जनावरांचा उपाशी पोटी हंबरडा ऐकू येत आहे. या संकटातून आता फक्त कोळाई हे दैवत एकमेव आधार वाटत असल्याने याही वर्षी हे ग्रामस्थ गाव रिकामं करून देवीच्या दरबात हजर झाले. कोळवाडीत सव्वादोनशे कुटुंब असून जवळपास पावणेदोन हजार लोकसंख्या आहे. शुक्रवारी गावातील प्रत्येक घरातून महिला, पुरुषांसह अबालवृद्ध मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसReligious programmeधार्मिक कार्यक्रम