शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

कोण म्हणतं फसवी, तर कोण चांगली; पण ‘लाडक्या बहिणीं’च्या मनात काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 16:09 IST

महायुतीच्या कोणत्याही नेत्याची सभा असली की त्यात ‘लाडकी बहीण’ या योजनेचा उल्लेख होतोच.

बीड : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे जात आहे. सध्या तरी प्रचारसभांमधून ‘लाडकी बहीण’ योजनेवरच भर दिला जात आहे. महाविकास आघाडीकडून ही योजना फसवी असल्याचे सांगितले जात आहे, तर महायुतीकडून ही योजना महिलांना आत्मनिर्भर करत असल्याचा दावा केला जात आहे. राजकारणी जरी वेगवेगळा दावा करत असले तर लाडक्या बहिणींच्या मनात काय? याचे उत्तर २३ नोव्हेंबरला निकालानंतरच समजेल. जिल्ह्यात १० लाख महिला मतदार असून १५ ऑक्टोबरपर्यंत ६ लाख २४ हजार लाडक्या बहिणींना लाभ मिळाला आहे. त्यामुळे बहिणींच्या कल कोणाकडे? याकडेही सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत.

मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण योजना’ आणण्यात आली. त्यानंतर बहिणींसाठी योजना आणल्याने सरकारवर टीका झाली. त्यामुळे सरकारने ‘लाडका भाऊ’ म्हणून तरुणांसाठीही योजना आणली. आता सरकारने नवीन आणलेल्या योजनांचाच पाढा प्रचारसभांमधून वाचला जात आहे. महायुतीच्या कोणत्याही नेत्याची सभा असली की त्यात ‘लाडकी बहीण’ या योजनेचा उल्लेख होतोच. एवढेच नव्हे, तर कॉर्नर बैठका, गावभेटी, मतदारभेटींमध्येही महायुतीचे उमेदवार या योजनेची आठवण महिला मतदारांना करून देत आहेत. याचा प्रतिसादही त्यांना मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीच्या छोट्या-माेठ्या सर्वच नेत्यांकडून या योजनेबद्दल आक्षेप नोंदवत ही योजना फसवी असल्याचे सांगितले जात आहे. ही योजना बंद पडणार, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे राजकारण तापू लागले आहे. आता बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणी कोणाला कौल देणार? त्या सुखी आहेत की नाराज? हे निकालानंतरच समजणार आहे. या याेजनेचा सरकाला फायदा होणार का? याकडेही लक्ष लागले आहे.

लाडक्या बहिणींचे मतदान निर्णायकजिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांचे मतदान कमी असले तरी आमदार करण्यासाठी लाडक्या बहिणींचे मतदान हे निर्णायक असणार आहे. जिल्ह्यात एकूण २२ लाखांवर मतदार आहेत. पैकी १० लाख ५५ हजार महिला मतदार आहेत. त्यामुळे महिलांच्या मतदानावर सर्वांचाच डोळा आहे.

प्रमुख पक्षाकडून एकच महिला उमेदवारमहायुतीत भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आहे. शिंदे गटाला पहिल्यांदाच एकही जागा नाही. तर सातपैकी केवळ केजमध्ये नमिता मुंदडा यांच्या रूपाने महिलेला उमेदवारी दिली आहे. इतर सहा ठिकाणी पुरुष उमेदवार आहेत. तसेच महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आहेत. यामध्ये एकाही ठिकाणी महिलेला उमेदवारी नाही.

११ महिला उमेदवार मैदानातजिल्ह्यात भाजपच्या नमिता मुंदडा यांच्यासह इतर प्रमुख पक्षांसह अपक्ष अशा ११ महिला या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. यात २८ वर्षांची तरुणी पूजा मोरे या देखील स्वराज्य पक्षाकडून गेवराई मतदारसंघात प्रस्थापितांविरोधात लढत आहेत.

लाडकी बहीण योजनेची आकडेवारी (१५ ऑक्टोबरपर्यंत)तालुका - एकूण अर्ज - पात्रशिरूर कासार - ३३५५३ - ३२६६४आष्टी - ६५९८८ - ६३०४१पाटोदा - ५४५२८ - ३१२६७बीड - १३७५३२ - ९८१०३केज - ५९०९८ - ५६६५४धारूर - ३१३८७ - २९८९८गेवराई - ९६९१७ - ९३५९९माजलगाव - ७०३८३ - ६५४८१वडवणी - २४४३४ - २३२२६परळी - ६८४८१ - ६४२९९अंबाजोगाई - ६९६५६ - ६६६९६एकूण - ७१२०५७ - ६२४९२८

मतदारसंघ पुरुष स्त्री तृतीयपंथीगेवराई १९९८८९ १८००१७ ३माजलगाव १८५८०६ १६६४७२ १बीड २०२७२० १८१३७२ ९आष्टी २०५३५६ १८१००१ १केज २०२६२० १८४५९५ ६परळी १७६०५० १६१९२२ ४एकूण ११७२४४१ १०५५३७९ २४

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकBeedबीड