शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जुने घोंगडे भिजत असताना, नवीन योजनांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:25 IST

जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गंत २४९ नवीन योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, यापुर्वीच्या २५६ योजनांची कामे अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा योजनांचे घोंगडे भीजत असताना नवीन योजना मंजूर झाल्या आहेत.

ठळक मुद्देराष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना : बीड जिल्ह्यात जुन्या २५६ योजनांची कामे अर्धवट, नवीन २४९ योजना मंजूर

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात २०१८-१९ या वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गंत २४९ नवीन योजनांना मंजुरी मिळाली आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, यापुर्वीच्या २५६ योजनांची कामे अर्धवट आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा योजनांचे घोंगडे भीजत असताना नवीन योजना मंजूर झाल्या आहेत. या योजना प्रशासनाच्या वतीने किती पारदर्शक पद्धतिने राबवल्या जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनांच्या माध्यमातून यापुर्वी २५६ योजना राबवण्यात आल्या होत्या, मात्र त्यापैकी बहुतांश योजना अर्धवट असून, मोठ्या प्रमाणात यात भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते. यापैकी अनेक प्रकरणामध्ये गुन्हे देखील दाखल झाले होते. मात्र, या प्रकरणांची चौकशी अंत्यंत संथ गतीने सुरू असून कुठल्याही प्रकराची कारवाई केली गेली नाही.जुनी प्रकरणे ताजी असताना यावर्षात राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून २४९ योजना मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यासाठी शासनाच्या वतीने ८६ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. या योजनांचा फायदा जवळपास ३०० वाड्या वस्त्या व गावांना होणार आहे. मात्र यापुर्वी राबवण्यात आलेल्या योजनांप्रमाणे या योजना रबवल्या जाऊ नयेत अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.प्रत्येक गावामध्ये जलसाठा उपलब्ध असलेल्या ठिकाणावरुन नळाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना राबवल्या जातात. यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना ही एक महत्त्वाची योजना आहे, मात्र या योजनेअंतर्गर यापूर्वी गाव पातळीवर समिती नेमून कामे करण्यात आली होती. मात्र या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला होता. यापैकी ४२ गावातील प्रकरणांची कायदेशीर चौकशी सुरु आहे. मात्र या प्रकरणाची चौकशी संथ गतीने सुरु असून, कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याचा संशय कामे न झालेल्या गावताली नागरिकांनी व्यक्त केला आहे.यापर्वीच्या योजना अर्धवट असताना नवीन योजना राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी ही कामे ई-टेंडरच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंते एस. यू. खंडारे यांनी दिली.२५६ योजना अपूर्णचयापुर्वी जिल्ह्यात २५६ योजना राष्ट्रीय पेयजल योजनांच्या माध्यमातून रबावण्यात आल्या आहेत. मात्र यापैकी ४२ योजना प्रगतीपथावर आहेत, १५४ योजना आर्थिक कारणांमुळे बंद आहेत, तर ६० योजनांची कामे अर्धवट आहेत. त्यामुळे यापैकी एकही योजना पूर्ण नसून, काही योजनांची भ्रष्टाचारासंदर्भात चौकशी सुरु आहे उर्वरित कामे रखडली आहेत.

टॅग्स :BeedबीडWaterपाणी