शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लाचेची मागणी करताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात अडकला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 14:36 IST

एका शेतकऱ्यास वाटणीपत्राप्रमाणे भाऊ,आई, वडिल, बहिण यांच्या नावे शेती करण्यासाठी आणि अनुदान मिळून देण्यासाठी मागितली लाच

आष्टी : तालुक्यातील मोराळा सजाचे तलाठी बाळू बनगे यांनी जमीन नावे करणे आणि अनुदान मिळून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी केली होती. यानंतर तडजोडी अंती ३००० रुपये लाच स्विकारण्याचे त्यांनी मान्य केले असता ते एसीबीच्या जाळ्यात अडकले. ही कारवाई मंगळवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास बसस्थानक परिसरात करण्यात आली. तलाठी बनगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

एका शेतकऱ्यास वाटणीपत्राप्रमाणे भाऊ,आई, वडिल, बहिण यांच्या नावे शेती करण्यासाठी आणि अनुदान मिळून देण्यासाठी ४५०० रुपये लाचेची मागणी तालुक्यातील मोराळा सजाचे तलाठी बाळू बनगे यांनी केली होती. याबाबत शेतकऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली.  यानंतर मंगळवारी बसस्थानक परिसरात तलाठी बनगे यांनी तडजोडी अंती ३००० रुपये स्विकारण्याचे मान्य केले. याचवेळी एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ही कारवाई लाचलुचपत विभागाचे उपअधिक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी.आय.रविंद्र परदेशी, पोलिस नाईक श्रीराम गिराम, पो शि.भारत गारदे, पो शि संतोष मोरे यांनी केली. या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला आष्टी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeedबीड