शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाळेतून घरी येताना मुलीची छेड, जाब विचारणाऱ्या आजोबावर टवाळखोरांचा चाकू हल्ला

By सोमनाथ खताळ | Updated: April 3, 2023 20:09 IST

बीडमधील घटनेने खळबळ, दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

बीड : शाळेतून घरी जाणाऱ्या ८ वीच्या वर्गातील अल्पवयीन मुलीला रस्त्यात अडवून छेड काढली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या आजोबावर चाकुने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना बीड शहरातील वर्दळीच्या असलेल्या तुळजाई चौकात सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

बीड तालुक्यातील एका गावातील पीडिता ही १४ वर्षांची आहे. बीड शहरातील एका शाळेत शिक्षणासाठी ती रोज ये-जा करते. सोमवारी सकाळी साडे अकरा वाजता शाळा संपल्यानंतर गावी जात होती. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी तिला तुळजाई चौकात अडविले. तिचा हात धरून छेड काढली. तिने लगेच आपल्या चुलत आजोबाला सांगितले. त्याने जाब विचारताच त्यांना शिवीगाळ करून निघून गेले. 

पीडितेने हा सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. नंतर सर्व नातेवाईक या टवाळखोरांकडे पंचशीलनगर भागात गेले. तेथेच सुदर्शन बांगर व अनिकेत नांगरे या दोघांनी पीडितेच्या चुलत आजोबावर चाकुने हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाल्याने तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पीडितेच्या फिर्यादीवरून सुदर्शन व अनिकेत यांच्याविरोधात शिवाजीनगर ठाण्यात रात्री साडे सात वाजता गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड