शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

"माझं लेकरू कुठे शोधू?" सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या आईचा आक्रोश, सारे सुन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:18 IST

"संतोषने संपूर्ण गावाचे भले केले. त्या दिवशी थोडेफार काही वाद झाले असतील, पण त्यासाठी त्याला का संपवलं?

मस्साजोग (बीड) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान संतोष देशमुख यांच्या आईच्या भावनांचा बांध फुटला. आपल्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.

संतोष देशमुख यांच्या आईने आपल्या मुलाच्या हत्येमागील अमानुषतेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "संतोषने संपूर्ण गावाचे भले केले. त्या दिवशी थोडेफार काही वाद झाले असतील, पण त्यासाठी त्याला का संपवलं? मी त्याची आई आहे, मला आता काय वाटत असेल? माझं लेकरू खूप चांगलं होतं. मी माझं लेकरू कुठे शोधू?" या शब्दांनी उपस्थितांचे मन हेलावले.

संतोष देशमुख यांच्या आईने आरोपींना शिक्षा व्हावी आणि कुटुंबाला संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांना दिलासा देत म्हणाल्या, "तुमचं लेकरू परत आणू शकत नाही, पण मी तुमच्या नातवांना नक्की न्याय मिळवून देईन. मी तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढेन."

आरोपी सापडत नाहीत, यावर विश्वास बसत नाहीसुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या मुलगा धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी आरोपींना पकडण्यात होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, "आमचे फोन टॅप करता येतात, मग आरोपी सापडत का नाहीत?" त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित करत लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली. गावकऱ्यांनी गावात भीतीचे वातावरण असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठिंबा देण्याचा शब्द दिला.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणSupriya Suleसुप्रिया सुळेBeedबीड