शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

कुठे आहात? घरीच थांबा! ताई, बप्पा येताहेत; बीडमध्ये उमेदवारांचा गाठीभेटीवर भर

By सोमनाथ खताळ | Updated: April 17, 2024 15:46 IST

बीडच्या उमेदवारांचा गाठीभेटीवर भर; कोणाकडे चहा-नाश्ता, तर कोणाकडे जेवण

बीड : कुठे आहेत... काय चाललंय... बरं... घरीच थांबा ताई, बप्पा तुम्हाला भेटायला येत आहेत. असे कॉल बीडमधील लोकसभा उमेदवार पंकजा मुंडे आणि बजरंग साेनवणे यांच्या पदाधिकाऱ्यांकडून काही लोकांना जात आहेत. घरी गेल्यावर वेळेनुसार चहा-नाश्ता, तर कोणाकडे जेवणही केले जात आहे. सध्या तरी प्रचार, सभा यापेक्षा गाठीभेटींवरच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भर दिल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. १८ एप्रिलपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात होईल; परंतु त्याआधीच महायुतीकडून भाजप नेत्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनवणे, तर वंचितकडून अशोक हिंगे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी मिळाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच हे सर्वच नेते गाठीभेटी आणि संपर्कावर भर देताना दिसत आहेत. अजून तरी प्रचार, सभांमधून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपाला तेवढी सुरुवात झाली नाही. जुने पदाधिकारी, कार्यकर्ते, ओळखीचे ज्येष्ठ नागरिक आदींच्या घरी जाऊन भेटी दिल्या जात आहेत. महायुतीचे उमेदवार शिंदेसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या पदाधिकाऱ्यांच्या घरी जात आहेत, तर आघाडीचे उमेदवार हे शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांच्या घरी जात असल्याचे दिसत आहे. यावेळी घरी आल्यावर या उमेदवारांना चहा, पाणी, नाश्ता दिला जात आहे. काही लोकांकडे जेवणही केले जात असल्याचे सांगण्यात आले.

पंकजा मुंडेंनी बनवला चहाउमेदवारी जाहीर झाल्यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे बीडला येत होत्या. अहमदनगरहून पाथर्डीमार्गे येताना शिवाजीराव कर्डिले यांच्या घरी त्या थांबल्या. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी येथे चहादेखील बनवला होता. याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

गड, दर्गाह, मंदिरांमध्ये जाऊन दर्शनतीनही पक्षांच्या उमेदवारांनी श्रीक्षेत्र नारायणगडासह जिल्ह्यातील इतर देवस्थान, दर्गाह, मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले आहे. त्या ठिकाणी पूजाही केली. श्रीक्षेत्र चाकरवाडी येथे पंकजा मुंडे यांनी भाविकांना पंगतही वाढली होती.

आता बैठकांवरही दिला जातोय भरगाठीभेटी घेऊन उमेदवारांकडून संपर्क वाढविण्याचा प्रयत्न केला जात होता; परंतु आता पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकाही घेतल्या जात आहेत. याच बैठकांचे छोट्या सभांमध्ये रूपांतर होताना दिसत आहे. या ठिकाणी आता पदाधिकारी, उमेदवार हे विरोधकांवर आरोप करताना दिसत आहेत.

टॅग्स :beed-pcबीडPankaja Mundeपंकजा मुंडेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४bajrang sonwaneबजरंग सोनवणे