शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संतोष देशमुख यांना कोणत्या हत्याराने मारले? आरोपींच्या वकीलांनी दिली माहिती; आका कोण तेही सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 20:41 IST

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणाती आणखी दोन मुख्य आरोपींना आज पोलिसांनी ताब्यात घेतले.

Santosh Deshmukh Case ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आणखी दोन मुख्य आरोपींना आज पुण्यातून पोलिसांनी अटक केली. या आरोपींना आज कोर्टाने १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. या प्रकरणातील आणखी आरोपी अजूनही फरारी आहे. या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. तर दुसरीकडे सरपंच देशमुख यांच्या लोकेशनची आरोपींना माहिती देणारा सिद्धार्थ सोनावणे यालाही पोलिसांनी कल्याणमधून ताब्यात घेतला आहे. सीआयडी अधिकाऱ्यांसह एसआयटीनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दरम्यान, आज कोर्टासमोर आरोपींना हजर केले. कोर्टात नेमकं काय घडलं? याची सर्व माहिती आरोपींच्या वकीलांनी आज माध्यामांना दिली.

'तुम्ही लोक मारून आरोपी घरात लपून ठेवता', मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंविरोधात थोपटले दंड

वकील म्हणाले,  आरोपींना आता १८ तारखेपर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे. आरोपींकडून फरार आरोपींची माहिती घ्यायची आहे. बाकीच्या आरोपींच्या समोर बसवून पोलिसांना चौकशी करायची आहे. आरोपींनी कोणते हत्यार वापरले याचं काही पीसीआर यादीत नमुद केलेले नाही. जर त्यांनी हत्यार वापरलेले नसेल तर त्यांना त्यांचा पीसीआर घेण्याचा अधिकार नाही. ही काही काल्पनिक घटना नाही, ही घटना प्रत्यक्ष घडली असं त्यांचं मत असेल तर त्यांनी डॉक्टरांचं मत घ्यायला पाहिजे. यात त्यांच्याकडून आरोपील मारहाण झाली आहे ती हत्यारे कोम कोणती सू शकतात. जर ती हत्यार जप्त केली आहेत. त्या हत्यारांशिवाय दुसरे कोणते हत्यार आहेत का? असं त्यांनी निष्पन्न करणे आवश्यक आहे, असंही वकील म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsAppचॅनल फॉलो करा!

टोळी गुन्हेगारीवर बोलताना वकील म्हणाले, "हा गुन्हा ३०२चा आहे. मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्या प्रमाणे मकोका लावावा, तर संघटीत गुन्हेगारी निष्पन्न होईल,असंही वकीलांनी सांगितलं.  गुन्हेगारांचा आका कोण आहे, या चर्चा बाहेर सुरू आहेत. या आकाच्या आज कोर्टरुममध्येही चर्चा झाली. मेन आका कोण आहे या प्रश्नावर बोलताना वकील म्हणाले, आम्ही काय आका वैगेरेचा संबंध नाही. विष्णू चाटे यांना अटक करुन वीस दिवस झाले आहे. विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केली आहे. वास्तविक पाहता हा किडनॅपिंगचा गुन्हा आहे. त्यांनी या आरोपींना यात घेणे आवश्यक होतं. यावरुन तपास यंत्रणा किती गांभीर्याने प्रकरण हाताळते हे स्पष्ट दिसते, असंही वकील म्हणाले. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणCourtन्यायालयPoliceपोलिस