शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर न्यायालयात काय झाला युक्तिवाद?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 19:04 IST

वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी; बीड न्यायालयाबाहेर राडा

बीड : वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर त्याला बुधवारी दुपारी बीड न्यायालयात हजर केले. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. न्यायालयातून बाहेर घेऊन जात असतानाच महिला वकिलासह इतर काही महिलांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर कराड समर्थकही आक्रमक झाले. त्यांनीही जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी या जमावातील काही लोकांना ताब्यात घेतले, तर दुसऱ्या बाजूला खोटे गुन्हे मागे घ्यावे, यासाठी परळीत दुसऱ्या दिवशीही बंद पाळण्यात आला. अनेक समर्थकांनी टॉवरवर चढून आंदोलनही केले.

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अगोदरच आठ आरोपी आहेत. त्यांच्यावर मकोका लावण्यात आलेला आहे. त्यानंतर आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या वाल्मीक कराड याच्यावरही मकोका लावावा, या मागणीसाठी सोमवारी मस्साजोग ग्रामस्थांनी आंदोलन केले होते. त्यानंतर मंगळवारी वाल्मीक कराड याला केज न्यायालयात हजर केले. तेथे खंडणीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी होताच मकोका लावल्याने सीआयडीने ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी दुपारी त्याला अगोदर केजच्या न्यायालयात हजर केले. तेथून दुपारी अडीच वाजता बीडमधील मकोका न्यायालयात आणले. त्यानंतर सरकारी वकील व कराडचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून घेत न्या. सुरेखा पाटील यांनी कराडला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

न्यायालयात काय युक्तिवाद?दुपारी अडीच वाजता बीडच्या मकोका न्यायालयात कराड याला बंदोबस्तात हजर केले. ३ वाजेच्या सुमारास न्या. सुरेखा पाटील यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ॲड. ठोंबरे हे छत्रपती संभाजीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले होते. ॲड. कोल्हे यांनी या गुन्ह्यात कराडचा कसा सहभाग आहे, तसेच फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काय कनेक्शन, सीडीआर तपासायचे आहेत, अशा प्रकारचे १० मुद्दे मांडून १० दिवसांची काेठडी मागितली. तर, कराडचे वकील ॲड. ठोंबरे यांनी या हत्याच्या गुन्ह्यात कराड यांचा कसलाही संबंध नाही. अगोदरच १५ दिवस कोठडी घेतलेली आहे. आता परत त्याच प्रश्नांवर काेठडीची गरज नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडी मागितली, परंतु न्या. पाटील यांनी दोन्ही युक्तिवाद ऐकून घेतल्यावर २२ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

महिला वकिलाची घोषणाबाजीकराड याला न्यायालयातून बाहेर नेत असताना, ॲड. हेमा पिंपळे यांच्यासह इतर महिलांनी घोषणाबाजी केली. तसेच, त्यांनी कराड याला फाशी देण्याची मागणी केली. प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता असली पाहिजे. जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीडला भेट द्यावी, अशी मागणी केली. या सर्व महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कराड समर्थकांचीही घोषणाबाजीमहिला वकिलाच्या घोषणेनंतर पुरुष वकिलांसह इतर समर्थकही आक्रमक झाले. त्यांनी कराड यांच्यावर दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली. तसेच कराडच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. अनेक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

छातीत दुखले, जेवणही टाळलेकराडाला मंगळवारी रात्री ८ वाजता जिल्हा रुग्णालयात तपासणी करून बीड जिल्हा कारागृहात नेले. छातीत दुखत असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केली, परंतु त्यानंतर कारागृहात गेल्यावर त्याने जेवण करणेही टाळल्याची माहिती आहे. बरॅक क्रमांक ९ मध्ये त्याचा मुक्काम होता. बुधवारी सकाळी देखील त्याची वैद्यकीय तपासणी केली.

समोर बंदोबस्त, मागच्या दाराने नेलेकराडला बीड न्यायालयात आणले जाणार असल्याने समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. हे पाहून पोलिसांनी समोर बंदोबस्त लावला, तर न्यायालयाच्या मागील दाराने तिसऱ्या मजल्यावरील मकोका न्यायालयात नेले. त्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने खाली आणून पोलिस व्हॅनमधून बीड शहर ठाण्याच्या कोठडीत नेले. न्यायालयासह परिसरात तगडा बंदोबस्त तैनात होता.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण