शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

दिग्गज नेते प्रचारापासून अलिप्त! बीड मतदारसंघात क्षीरसागर, मस्के, मुळूक यांची भूमिका काय?

By सोमनाथ खताळ | Updated: November 12, 2024 17:51 IST

आघाडीत मस्के, तर मुळूक युतीत असतानाही उमदेवारांच्या प्रचारात फारसे सक्रिय नाहीत

बीड :बीड मतदारसंघाचा प्रचार गतिमान झाला आहे. यासोबतच प्रमुख नेत्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतला; परंतु निवडणुकीतील भूमिका अद्यापही स्पष्ट केली नाही, तर दुसऱ्या बाजूला महायुतीतील शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि महाविकास आघाडीतील शरद पवार गटात प्रवेश केलेले राजेंद्र मस्के हेदेखील आपल्या उमेदवारांसोबत प्रचार करताना फारसे सक्रिय नाहीत. त्यामुळे यांची भूमिका काय? याबाबत चर्चा सुरू झाली आहे. क्षीरसागर यांची बैठक झाली आहे, तर मस्के यांनी १२ नोव्हेंबरला तातडीची बैठक घेणार आहेत.

बीड मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार गटाचे डॉ. योगेश क्षीरसागर, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर, तिसऱ्या आघाडीकडून कुंडलिक खांडे आणि अपक्ष म्हणून अनिल जगताप यांच्यासह इतर उमेदवार मैदानात आहेत. सध्या हे सर्वच उमेदवार प्रचारात व्यस्त आहेत. परंतु उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले, तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनीही अचानक अर्ज मागे घेतल्याने चर्चेला उधाण आले होते. आता ते कोणाला पाठिंबा देणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या हाेत्या. मागील दोन दिवसांपासून कार्यकर्त्यांकडून भूमिका जाहीर करा, असा आग्रह क्षीरसागर यांच्याकडे केला जात आहे. त्यामुळे त्यांनी प्रमुख लोकांसोबत बैठक घेतली. इतरही काही लोकांसोबत बैठक घेतली. परंतु सोमवारी दुपारपर्यंत त्यांनी भूमिका जाहीर केली नव्हती.

कोणत्या पुतण्याला देणार पाठिंबा?माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दोन्ही पुतणे संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर हे विधानसभा निवडणूक लढवत आहेत. दोघेही एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर कोणत्या पुतण्याला पाठिंबा देणार? की तटस्थ राहणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजेंद्र मस्केंनी बोलावली बैठकजिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भाजपमधून बाहेर पडत शरद पवार गटात प्रवेश केलेल्या राजेंद्र मस्के यांनीही बंडखोरी करत जरांगे पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु नंतर तो मागे घेतला. असे असले तरी ते सध्या प्रचारात सक्रिय नाहीत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मात्र त्यांनी एका ठिकाणी भेट घेत स्वागतही केले. आता मंगळवारी त्यांनी प्रमुख लोकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या ठिकाणाहून ते भूमिका जाहीर करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सचिन मुळूक यांची अडचणबीडची जागा शिवसेनेला असायची. परंतु यावेळी ती राष्ट्रवादीला गेली. डॉ.योगेश क्षीरसागर यांना उमेदवारी मिळल्याने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी बंडखोरी केली, तर दुसरे जिल्हाप्रमुख सचिन मुळूक हे अद्यापही महायुतीचे उमेदवार असलेल्या क्षीरसागरांच्या प्रचारात पूर्ण ताकदीने सक्रिय नाहीत. एकीकडे पक्ष म्हणून क्षीरसागरांचा प्रचार करायचा की मित्र म्हणून अनिल जगताप यांना पाठबळ द्यायचे, अशी अडचण मुळूक यांच्यासमोर झाली आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडेही लक्ष लागले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४beed-acबीडmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर