शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दवाखान्याजवळ रुग्णाचे ठोके बंद पडले तर काय करायचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 01:23 IST

दवाखान्यांमध्ये अथवा दवाखान्याबाहेर एखादा व्यक्ती अचानक कोसळली व त्याचे हृदय व श्वास बंद झाला, तर त्याच्या छातीवर शास्त्रोक्त पद्धतीने दाब देऊन त्याचे जीवन वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे याचे शास्त्रोक्त जीवन संजीवनी प्रक्रि या प्रशिक्षण शहरातील ७० परिचारिका आणि कंपाउंडर यांना रविवारी देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दवाखान्यांमध्ये अथवा दवाखान्याबाहेर एखादा व्यक्ती अचानक कोसळली व त्याचे हृदय व श्वास बंद झाला, तर त्याच्या छातीवर शास्त्रोक्त पद्धतीने दाब देऊन त्याचे जीवन वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे याचे शास्त्रोक्त जीवन संजीवनी प्रक्रि या प्रशिक्षण शहरातील ७० परिचारिका आणि कंपाउंडर यांना रविवारी देण्यात आले.जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बीड शाखेच्या वतीने शहरातील या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका व कंपाउंडरचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. रुग्ण सेवेतील सहभागाबद्दल प्रशंसा करण्यात आली.आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल उपस्थित होते. डॉ. बारकुल यांच्यासह इंडियन सोसायटी आॅफ अनास्थेशियोलॉजीचे डॉ. मुकुंद पैठणकर, डॉ. रश्मी पैठणकर, डॉ. स्वप्नजा देशमुख, डॉ. सुनिता बारकुल यांनी प्रशिक्षण दिले. लहान मुलांबाबत डॉ. सचिन जेथलिया यांनी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन आयएमए उपाध्यक्ष डॉक्टर अनुराग पांगरीकर यांनी केले. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी वुमन्स विंगच्या अध्यक्ष डॉ. प्रज्ञा तांबडे, उपाध्यक्षा डॉ. शुभदा पांगरीकर यांनी विशेष प्रयत्न केले. आयएमएचे सचिव डॉ. विनोद ओस्तवाल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.कार्यक्रमात एका परिचारिकेबरोबर आलेल्या पाच वर्षांच्या श्रीनिधीला ‘आज तू काय शिकली?’, असा प्रश्न विचारला असता तिने जीवन संजीवनी प्रणाली प्रक्रिया कशी द्यायची हे व्यविस्थत करून दाखवले. यावेळी आमच्या आयुष्यात आम्ही एखादी व्यक्ती जरी अशाप्रकारे जीवन संजीवनी प्रतिक्रि या देऊन वाचवू शकलो तर आमच्या नर्सिंग आयुष्याचे सार्थक झाले असे वाटेल अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी दिली. या प्रशिक्षणाचा फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMedicalवैद्यकीयSocialसामाजिक