शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बीडमध्ये ओला, सुका कचरा; विल्हेवाटीसाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:23 IST

कच-यापासून शहराला कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी व त्यापासून विविध उपयोगी वस्तू वापरात आणण्याचे प्रयत्न होतआहेत. हाच धागा पकडून उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर, छत्तीसगड येथील अंबिकापूर हे गाव स्वच्छतेसाठी मॉडेलमधून पुढे आणणारे प्रवीण नायक यांनी विविध भागांची पाहणी करून आढावा घेतला.

ठळक मुद्देउपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांकडून विविध भागांची पाहणी

बीड : स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानात बीड शहराचा समावेश झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून  शहरातील स्वच्छतेचा आणि ओल्या व सुक्या कच-याचा प्रश्न कायम असून यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी पावले उचलली जात आहेत. कच-यापासून शहराला  कायमस्वरुपी मुक्त करण्यासाठी व त्यापासून विविध उपयोगी वस्तू वापरात आणण्याचे प्रयत्न होतआहेत. हाच धागा पकडून उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ.धनंजय  जावळीकर, छत्तीसगड येथील अंबिकापूर हे गाव स्वच्छतेसाठी मॉडेलमधून पुढे आणणारे प्रवीण नायक यांनी विविध भागांची पाहणी करून आढावा घेतला.

स्वच्छ सर्वेक्षण २०१९ साठी बीड शहराची निवड झालेली आहे. शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नी ओला व सुका कचरा कसा वेगळा करायचा, त्यावर कशा उपाय योजना करायच्या? यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी अंबिकापूर मॉडेलचे प्रवीण नायक, प्रदीप कानवडे हे बीडमध्ये दाखल झालेले आहेत. कचºयापासून समाजोपयोगी वस्तू तयार करणे, सिमेंट प्लॅन्ट तयार करणे, बांधकाम साहित्याची निर्मिती करणे या पार्श्वभूमीवर बीड शहरातील नाळवंडी नाका, जिरेवाडी, समनापूर येथील कचरा टाकलेल्या ठिकाणांची पाहणी केली. यावेळी काही सूचनाही उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी दिल्या. यावेळी स्वच्छता निरीक्षक विश्वंभर तिडके, भागवत जाधव, सुनील काळकुटे, आर.एस.जोगदंड, भारत चांदण आदी उपस्थित होते.गांडूळखत निर्मितीच्या प्रकल्पाचे कौतुकचओला व सुका कचरा वेगळा करुन त्यापासून गांडूळखत निर्मितीचे प्रकल्प शहरात सुरू केले आहेत. स्वच्छतेचे मॉडेल बनवणारे नायक यांनी धर्मराज जोशी उद्यान येथील गांडूळखत निर्मितीच्या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे त्यांनी स्वागत केले. यावेळी हेमंंत क्षीरसागर, डॉ.जावळीकरही उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडGarbage Disposal Issueकचरा प्रश्नMarathwadaमराठवाडा