शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघास कुटुंब मानून विकास करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 00:10 IST

केज विधानसभा मतदारसंघ हे कुटुंब मानून कुटुंबाप्रमाणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नमिता अक्षय मुंदडा यांनी केज तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये दिली.

ठळक मुद्देनमिता मुंदडा यांचे केज मतदारसंघातील आनंदगाव, सारणी, सोनीजवळा येथे प्रतिपादन

अंबाजोगाई : केज विधानसभा मतदारसंघ हे कुटुंब मानून कुटुंबाप्रमाणे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही नमिता अक्षय मुंदडा यांनी केज तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या सभांमध्ये दिली.केज विधानसभा मतदारसंघातील भाजपा-सेना-महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या बुधवारी केज तालुक्यातील आनंदगाव, सारणी, सोनीजवळा, पैठण, ढाकेफळ आदि गावांमध्ये सभा व बैठका झाल्या. यावेळी मतदारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या सदस्या डॉ.योगिनी थोरात यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना नमिता मुंदडा म्हणाल्या, जनतेचे ठिकठिकाणी मिळणारे मोठे पाठबळ हीच आमच्या मुंदडा कुटुंबियांची खरी शक्ती आहे. कै. डॉ. विमल मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाचा कायापालट झाला. अनेक विकासाच्या महत्त्वपूर्ण योजना त्यांनी राबविल्या. अंबाजोगाई व केज शहराला कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाणीपुरवठा योजना केल्या. अंबाजोगाईत कार्यान्वित झालेली सर्व कार्यालये त्यांच्या कार्याची साक्ष देतात. सिंचनाचा प्रश्न मार्गी लावला. पाझर तलाव व साठवण तलावांचे मोठे जाळे निर्माण केले.विजेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लावला. मंदिर तिथे सभामंडप, स्मशानभूमी, रस्ते, वीज, पाणी या सर्व पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. गावांना भरभरून विकासासाठी निधी प्राप्त झाला. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले.आगामी काळातही पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघाला कुटुंब मानून मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. केज विधानसभा मतदारसंघ विकासाच्या बाबतीत महाराष्ट्रात नाव उंचावेल, अशी कामगिरी आपण करून दाखवू, असे नमिता मुंदडा म्हणाल्या.मतदारसंघाला ‘त्या’ दिशा देतील: थोरातनमिता मुंदडा या उच्च विद्याविभूषित उमेदवार आहेत. त्यांच्याकडे विकासाची मोठी दृष्टी आहे. विकासाचा आराखडा त्यांनी तयार केला आहे. पंकजा मुंडे व डॉ. प्रीतम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली विकासाची मोठी गंगा आपल्या मतदारसंघात येणार आहे. यासाठी सक्षम नेतृत्व म्हणून मतदारसंघाला त्या नवी दिशा देतील. त्यांच्या माध्यमातून मतदारसंघाचा विकास साध्य होईल. ज्याप्रमाणे विमलताईंच्या नेतृत्वाने मतदार संघाला गती दिली. त्याच धर्तीवर नमिता मुंदडाही मतदार संघाला विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवतील व या भागाचा निश्चितच विकास करतील, असे प्रतिपादन डॉ.योगिनी थोरात यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा